Categories: करमाळा

गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचे उत्तम हानपुडे सरांना महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी करमाळ तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे येथे कार्यरत असलेले उत्तम हानपुडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी टिडी एफ यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत एबीपी माझाचे संपादक प्रवक्ते प्रसन्ना जोशी पालघरचे आमदार राजेंद्र गावीत ,आमदार निरंजन डावखरे ,आमदार राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडी यांच्या पालघर येथील राज्य अधिवेशनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडी यांच्या पालघर येथील राज्य अधिवेशनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.26 एप्रिल टी.डीएफ महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीच्यावतीने हे अधिवेशन स.तु.कदम माध्यमिक विद्यालय पालघर येथे संपन्न झाले.महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडी राज्य अध्यक्ष जी के थोरात सर स्वागत अध्यक्ष नरसू पाटील सर कार्यवाहक पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर व राज्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उत्तम हानपुडे सरांनी आर्थिक विकास महामंडळ योजनाग्रामस्वच्छता अभियान व महसुल योजना राबवुन सोलापूर जिल्ह्यात गौंडरे गावाची आदर्श गांव म्हणून ओळख निर्माण केली आहे.सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून १९९८ ते २००२ पर्यंत काम केले आहे.तसेच माध्यमिक शिक्षक संघटनेचे सन २००३ मध्ये सभासद, सन २००४ ते २००९ करमाळा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड. सन २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१९ पर्यंत संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे.तर सन २०२० ते २०२३ सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष.
सन २०२४ मध्ये पून्हा एकदा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड होऊन ते आजपर्यंत शिक्षकांच्या न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत . याबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सन २०१५ ते आजतागायत वधू-वर सूचक केंद्रांच्या माध्यमातून २१८ विवाहसंपन्न तसेच १३ पूर्नविवाह करण्यात आले आहे.शालेय उपक्रमाअंतर्गत- सन २००० ते आजतागायत शालेय उपक्रमामध्ये झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर अनेक थोर महापुरूषांच्या जयंती निमीत्त विशेष उपक्रम राबविण्यात आले. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत पुणे विभागात तृतीय क्रमांक आलेला आहे. शिक्षकी पेशा सांभाळून समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या उत्तम हानपुडे यांना त्यांच्या कामाची पोहचपावती म्हणून आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

2 hours ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

12 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

1 day ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago