Categories: Uncategorized

नेरले सोसायटी मतदार यादी प्रसिद्ध न करता निवडणूक जाहीर करणे सभासद कमी व बोगस समाविष्ट करण्याबाबत, आठ दिवसात कारवाई न केल्यास उपोषण करणार -माजी सरपंच औदुंबरराजे भोसले पाटील

करमाळा प्रतिनिधी नेरले सोसायटी मतदार यादी प्रसिद्ध न करता निवडणूक जाहीर करणे,सभासद कमी व बोगस समाविष्ट करणे, आठ दिवसात कारवाई न केल्यास उपोषण करणार असल्याची मागणी माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे ‌ केली आहे. या निवेदनाचा असे म्हटले आहे कि‌ नेरले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पूर्वी प्रारूप व अंतिम यादी प्रसिद्ध न करताच प्रसिद्ध केल्याची बनावट कागदपत्रे बनवून सचिव व अधिकारी कर्मचारी यांनी संगणमताने निवडणूक प्रोग्राम जाहीर केला.सभासद यादीमध्ये नियमबाह्य धाराशिव जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नागरिकांचा समावेश केला आहे व गावातील नियमानुसार 30 वर्षापासून असणारे 100 ते 125 सभासद कमी करून लाखो रुपये सभासद रकमेचा चा अपहार केला.सचिव सदाशिव पांडुरंग पाटील पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर स्वतःचे बंधूचे व कुटुंबीयांची नावे यादीमध्ये समाविष्ट केली आहेत.त्या संदर्भात आम्ही दोन वर्षापासून संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करून न्याय व कागदपत्रे मागत आहोत.न्याय देखील नाही व कागदपत्रे देखील दोन वर्षापासून मिळत नाही.यासाठी सहाय्यक निबंधक व वरिष्ठांकडे अनेक तक्रारी अर्ज करून देखील याची दखल घेतली नाही.त्यामुळे सचिव श्री.सदाशिव पांडुरंग पाटील,दैवशाला सदाशिव पाटील,गणेश पांडुरंग पाटील,पूजा गणेश पाटील,खालील शेटे,सहाय्यक निबंधक श्रीमती रतन महावीर बोलवाडे,असिस्टंट सहाय्यक निबंधक श्री उमेश हरिचंद्र बेंढारी,कर्मचारी श्रीमती एस के मुंडे नऊ जणांनी संघटितपणे,सभासद कमी करणे,सभासद रकमेच्या अपहार करणे,बोगस सभासद वाढविणे,यादी प्रसिद्ध न करता प्रसिद्ध केल्याचे खोटे दाखवून निवडणूक जाहीर करणे,या दोषींवर कारवाई करणे योग्य असताना करण्यास दिरंगाई लावणे,मागितलेली माहिती न देणे.ही संघटित गुन्हेगारी आहे.यांच्यावर आठ दिवसाच्या योग्य ती कार्यवाही न केल्यास व मागितलेली माहिती न दिल्यास दि-05/05/2025 रोजी आमरण उपोषण सहाय्यक निबंधक करमाळा यांच्या कक्षात सुरू करणार असल्याची माहिती नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री.औदुंबरराजे भोसले यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे.डोक्याला मार लागून कवटी फुटली आहे.त्यामुळे मला फिटचा त्रास आहे.डॉ वळसंकर व डॉ भुतडा सोलापूर यांचे प्रत्येक दिवशी तीन वेळेस औषधे चालू आहेत.या उपोषणामुळे माझ्या जीवितास धोका झाल्यास हीच माझी फिर्याद समजून सदर नऊ जण व इतर या प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

7 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

7 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago