करमाळा प्रतिनिधी : – जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून काम करणारे कामगार नेते स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या जनसेवेचा वारसा सावंत कुटुंबाने जपण्याचे काम केले असल्याचे मत आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले.
हमाल पंचायत चे संस्थापक अध्यक्ष , माजी जिल्हा परिषद सदस्य व आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक सुभाष आण्णा सावंत यांची 74 वी जयंती 1 मे रोजी ‘ हमाल भवन ‘ येथे सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार श्री. नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन संचालक डॉ. वसंतराव पुंडे , डॉ. हरिदास केवारे, संचालक राजाभाऊ कदम, डॉ. बाबुराव लावंड, गोपाळ बापू सावंत, दादासाहेब सावंत, चेअरमन प्रभाकर शिंदे, सरपंच अंकुश शिंदे, संचालक विठ्ठल शिंदे, नगरसेवक गोविंद किरवे , चेअरमन मनोज गोडसे, करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, पत्रकार जयंत दळवी , नानासाहेब घोलप, अशोक मुरूमकर , यांच्या उपस्थितीत केले.
यावेळी जयंती निमित्त पुढे बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत हे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये संघर्षातून तावून सुलाखून तयार झालेले नेतृत्व होते. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रस्थास्पिताविरुद्ध संघर्ष करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. त्यामुळे जनतेने त्यांना हमाल पंचायत चे संस्थापक अध्यक्ष, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद सदस्यपदी त्यांना काम करण्याची संधी दिली. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातही सुभाष आण्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून आमचे वडील स्व.गोविंद बापू पाटील यांच्या पासून सावंत कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते आहे. सुभाष आण्णा सावंत यांच्या निधनानंतर सावंत गटाची यशस्वी धुरा सांभाळून त्यांचे बंधू विठ्ठल आप्पा सावंत भगवान सावंत यांनी त्यांचे काम चालू ठेवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम ते करत आहे. त्यांची पुढील पिढीही समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करीत आहेत. सुभाष आण्णा यांचे सुपुत्र ॲड . राहुल सावंत यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, हमाल पंचायत अध्यक्ष म्हणून यशस्वी काम केले असून सध्या त्यांची आदिनाथच्या संचालकपदी निवड झाली आहे. पुतणे संजय उर्फ पप्पू सावंत हेही नगरसेवक म्हणून करमाळा शहराची सेवा करत आहे तर पै.सुनील बापू सावंत ही सावंत गटाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जपून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. सर्वसामान्यांच्या सुख दुःखामध्ये सामील होऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तंटे सोडवत खऱ्या अर्थाने जनसेवेचा वसा जपून सुभाष आण्णा सावंत कार्य पुढे नेण्याचे काम हे कुटुंब करीत आहे . गोरगरीबांच्या सुख दुःखात सहभागी होऊन तसेच सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचे काम करीत आहेत. कर्तृत्व, दातृत्व ,नेतृत्व यांचा अनोखा संगम असलेले आजच्या युगामध्ये सावंत कुटुंब हे खऱ्या अर्थाने आदर्श कुटुंब असून ते करीत असलेले काम बघून स्वर्गात सुद्धा आण्णांना आनंद वाटत असेल असे गौरव उद्गगार आमदार नारायण पाटील यांनी काढले.
कामगार नेते सुभाष आण्णा सावंत यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर प्रसंगी सुनिल बापू सावंत, संचालक डॉ. अमोल घाडगे, अँड बलवंत राऊत, उद्योगपती योगेश गानबोटे, राजू शियाळ , देवा लोंढे, ॲड . सुहास मोरे, रामकृष्ण माने, अशोकराव ढवळे, डॉ . गादिया, डॉ. अनुप खोसे, डॉ. संकेत सावंत, डॉ. दिपक केवारे, व मान्यवर उपस्थित होते.
तसेच रुग्णांना फळे व खाऊ वाटप प्रसंगी चेअरमन प्रभाकर शिंदे, पाराजी शिंदे, सरपंच भोजराज सुरवसे, विलास रोडगे, संचालक वालचंद रोडगे, सरपंच बाळासाहेब काळे, सुभाष जाधव, सरपंच आजिनाथ भागडे, ॲड . प्रशांत बागल, छगन शिंदे, सुभाष शिंदे, हरिदास मोरे व मान्यवर उपस्थित होते.
तसेच गोशाळेत मुक्या जनावरांना हिरवा चारा वाटप प्रसंगी नगरसेवक संजय सावंत, सरपंच भाऊसाहेब काळे, सरपंच धनंजय शिंदे, हनुमंत काळे महाराज, सचिन काळे, नगरसेवक मनोज राखुंडे, नगरसेवक फारूक जमादार, अल्लाउद्दीन शेख, सरपंच महादेव वायकुळे, भागवत वाघमोडे, सतीश मोटे व मान्यवर उपस्थित होते.
तसेच श्री रामाच्या वनवासाला निघालेले वीट येथील श्रीराम भक्त वनवासी यांनी आण्णांना अभिवादन करून भजन, अभंग ,भक्तीगीत गाऊन आण्णांच्या प्रती त्यांच्या स्मृतीस उजाळा दिला.
अशा विविध सामाजिक उपक्रमाद्वारे स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संचालक डॉ. वसंतराव पुंडे, सरपंच निवृत्ती सुरवसे सर, नगरसेवक ॲड . नवनाथ राखुंडे, पत्रकार नानासाहेब घोलप, अशोक काळे, भीमराव लोंढे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बागल गटाचे नेते श्री दिग्विजय बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर, माजी सभापती गहीनीनाथ ननवरे, जिल्हा परिषद माजी सदस्य बिभीषण नाना आवटे, राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष वारे, माजी संचालक शशिकांत केकाण, मा संचालक प्रकाश झिंजाडे , मा सरपंच बिभीषण खरात, सरपंच दौलत वाघमोडे, चेअरमन वंदन नलवडे, ॲड.नानासाहेब शिंदे, मा नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, वैभव मुरूमकर, संतोष वाळुंजकर ,चेअरमन शहाजी शिंगटे, काशिनाथ नलवडे, विलास नलवडे, सरपंच रंजीत मोरे, भगवान भोई, व्यापारी मनोज पितळे, मयूर दोशी, उत्कर्ष गांधी, मयूर देवी, प्रीतम गादिया, विलास जाधव, पत्रकार महेश दादा चिवटे ,अशोकराव नरसाळे, नासीर कबीर , राजेश गायकवाड, मुस्तकीन पठाण, सोहल पठाण, आण्णा सुपनवर , सूर्यकांत भाऊ पाटील, शिंगटे सर, मा उपसभापती दत्तात्रय अडसूळ, श्रीकांत घोलप, कमलाकर घोलप, महेंद्र शिंदे, तात्या जाधव, चेअरमन चंद्रकांत काळे , बोरगाव चे संजय शिंदे, एच.आर.पाटील, विजय सुपेकर, सचिन गायकवाड, पै. दादा इंदलकर, बापू बेंद्रे, रावसाहेब शिंदे, आबा वारे, गणेश अंधारे, अतुल शिंदे, रोहित सोरटे आदि मान्यवर उपस्थित होते.
चौकट : –
एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन अगदी योगायोग म्हणजे या कामगार दिनी कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांची जयंती असल्याने याचे औचित्य साधून यावेळी ज्येष्ठ कामगार बबन भाऊ सुरवसे, पत्रकार जयंत दळवी ,नानासाहेब घोलप, अशोकराव मुरूमकर यांच्या हस्ते कामगारांचे झेंडावंदन करण्यात आले.
करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर…
करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…