करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उजनीची पाणी पातळी खालावली असली तरी कोळगाव धरणातील पाणी पातळी बऱ्यापैकी असताना आमदार नारायण आबा पाटील यांनी कार्यतप्तरता दाखवून पुर्व भागातील गौंडरे, आवाटी, नेरले, सालसे, कोळगाव आदि गावातील संभाव्य पाणी टंचाई, गुरासाठीची चारा टंचाई दुर करण्यासाठी वेळीच पाऊल उचलून उन्हाळी आवर्तन देण्याच्या सुचना संबंधित विभागास केली. यामुळे शनिवार दि.३ मे २०२५ रोजी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते व जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या हस्ते सिना-कोळगाव उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन चालू करण्यात आले.
त्यावेळी आ.स.सा.का.संचालक आबासाहेब अंबारे,सिना-कोळगाव आभियंता कांबळे साहेब,बप्पा आतकरे,महादेव धोंडे,महेश पाटील,सतीश रुपणवर,जयराज कदम,सोमनाथ येवाळे,नागनाथ धोंडे,तात्या तांबे,गणेश पाटील तसेच गौंडरे,आवाटी,नेरले,कोळगाव,सालसे भागातील शेतकरी ऐन उन्हाळ्यात पाणी सुटल्याने समाधानी झाला आहे. सीना कोळगाव उपसा सिंचन योजनेतुन या अगोदरही एक आवर्तन देण्यात आले. ही योजना पुर्ण क्षमतेने चालण्यासाठी पंपहाऊस तसेच मुख्य कालवा दुरुस्तीसाठीही आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…