Categories: Uncategorized

पाटबंधारे विभागाची गळचेपी भूमिका शेतकऱ्यांच्या मुळावर ! भरत आवताडे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील 24 गावांची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामांसाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी 116 कोटी निधी मंजूर करून आणून त्याचे काम डिसेंबर 2023 मध्ये सुरू केलेले होते, परंतु नोव्हेंबर 2024 रोजी करमाळा तालुक्यात सत्तांतर झाले आणि त्यानंतर दहिगाव योजनेचे सुरू असलेले काम जानेवारी 2025 मध्ये बंद पडले. हे बंद पडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी आपण पाटबंधारे विभागाला रीतसर पत्र दिले होते.काम सुरू न झाल्यास आपण जनआंदोलन उभे करू असा इशाराही दिलेला होता.परंतु पाटबंधारे विभाग याविषयी गळचेपी भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे.
जानेवारी 2025 मध्ये बंद पडलेले दहिगाव योजनेचे काम एप्रिल 2025 अखेर सुरू झाले,परंतु हे काम पुन्हा एकाच दिवसात जेऊरच्या गावगुंडांनी येऊन बंद केले.यासंदर्भात पाटबंधारे विभाग, करमाळा पोलीस स्टेशन या सर्वांना कल्पना आहे.कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांचे सूचनेनुसार पोलिसांनी काम बंद पडलेल्या ठिकाणी जाऊन माहितीही घेतली परंतु दुर्दैवाने गुन्हा दाखल करण्यासाठी एकही कर्मचारी पुढे येत नाही. यापूर्वी जळीत पाईप प्रकरणात अज्ञातावरती गुन्हा दाखल केलेला होता असे असतानाही संबंधित गुन्हा दाखल करणारावरती प्रचंड दहशत दाखवली गेली. काम बंद पाडणारे गावगुंडांची नावे निष्पन्न झालेली आहेत ती पोलिसांकडे सुद्धा दिलेली आहेत .परंतु पाटबंधारे विभाग याविषयी तक्रार करायला पुढे येत नाही त्यामुळेच सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होत नाही याचाच गैरफायदा लोकप्रतिनिधीने पोसलेले गावगुंड घेत आहेत. त्यामुळे येत्या 16 मे रोजी अर्जुननगर फाटा येथे सकाळी 10 वाजता आपण रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी दिली आहे.

चौकट –
MH 42 Q 3141 या गाडीतून 6 गावगुंड आले व त्यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेची डावी वितरिका क्र.1 चे पांडे हद्दीत सबस्टेशन लगत सुरू असलेले काम 26 एप्रिल रोजी बंद पाडले. पोलीस पाहणी करून गेले. त्यांना गाडी नंबर व गाडीतील दोघांची ओळख पटलेली नावे दिलेली आहेत. परंतु पाटबंधारे विभाग मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे यायला तयार नाही.पाटबंधारे विभागाची हीच गळचेपी भूमिका शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे.
– एस.बी.बिचितकर.कंत्राटदार प्रतिनिधी.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago