Categories: Uncategorized

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा 95.32%निकाल


करमाळा प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे फेब्रु/मार्च 2025 परीक्षा इयत्ता 12 वी वार्षिक निकाल जाहीर झाला. करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतरात चव्हाण महाविद्यालय इयत्ता 12 वीचा 95.32 % निकाल लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा 98.52 % , वाणिज्य शाखेचा 97.77 % तर कला शाखेचा 92. 01 % निकाल लागला आहे.*विज्ञान शाखेमध्ये*- प्रथम तीन क्रमांक कुमारी कोंडलकर भक्ती सतीश 73.67 % प्रथम क्रमांक, कुमारी व्हरे सिद्धी यशवंत 73.50% द्वितीय क्रमांक, कुमार कोळेकर विक्रमादित्य बाळासाहेब 73.17 % तृतीय क्रमांक. *वाणिज्य शाखेमधील* प्रथम तीन क्रमांक – कुमारी वासानी मानसी हेतल 90.67 प्रथम क्रमांक, कुमारी सांगळे अमृता नितीन 87.17 द्वितीय क्रमांक, कुमारी चौगुले अनुष्का संतोष 85.50 तृतीय क्रमांक. तर *कला शाखेचे* प्रथम तीन क्रमांक – कुमारी मारडकर संजना अनिल 88.00%प्रथम क्रमांक, कुमारी गोरे पुजा राजेंद्र 86.50% द्वितीय क्रमांक, कुमारी शेख गुलनाज अबूबकर 82.33% तृतीय क्रमांक असे विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील प्रथम तीन क्रमांक आलेले आहेत.
या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव आदरणीय श्री. विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago