Categories: करमाळा

करमाळा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी कुंटणखाना वेश्या व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पीडीत महिलांची सुटका

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणे हद्धीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पीडीत महीलांची सुटका दि. ०४/०५/२०२५ रोजी पो. निरीक्षक. रणजीत माने यांना गोपणीय माहीती मीळाली की, मौजे विट गावचे शिवारात एक इसम अवैध कुंठण खाना चालवित आहे, अशी गोपणीय माहीती प्राप्त होताच त्यांनी सदर बाबत छापा कारवाई करणे करीता मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री अजित पाटील साहेब. करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहीती देवून छापा कारवाई करीता अधिकारपत्र घेवून छापा कारवाई करणे करीता, म.स.पो.नि./म्हस्के, पो.उप.निरी. / चंदनशिव, स.पो.उप. निरी. /शिनगारे, पो.हवा./१५० लोहार, पो. हे. कॉ/१३० महेश डोंगरे, पो. शि./२१४० शिंदे, पो.शि./१७४८ घोगडे, म.पो.शि./१६६ पारधी, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे याना बोलावून सांगितले की, गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, करमाळा पोलीस ठाणे ह‌द्दीमधील हॉटेल साईलीलाचे पाठीमागे पाझर तलावाजवळ, मौजे वीट, ता. करमाळा या ठिकाणी एक इसम काही महिलांना डांबुन ठेवुन त्यांचेकडुन अनाधिकृतपणे जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत आहे अशी बातमी मिळाली आहे. त्या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवुन पंचांसमक्ष छापा कारवाई करावयाची आहे. असे सांगुन मागदर्शन करून, दोन पंच व बनावट गिन्हाईक सह व साहीत्यासह, शासकिय वाहनाने कारवाईसाठी ००:१४ वा. रखाना होवून, वीट येथील पाझर तलावाचे जवळ असलेल्या साईलीला हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या खोलीमध्ये जावुन छापा कारवाई करुन तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची ताबेत घेतले आहे त्या नंतर,नमुद ठिकाणी मिळून आलेला इसम नामे संतोष रोहीदास जगदाळे, वयः ४१ वर्षे रा. वीट, ता. करमाळा याचेकडे पोलीसांनी पंचासमक्ष विचारणा केली असता नमुद शेड हे त्याच्या मालकीचे शेतात बांधलेले असुन त्यामध्ये तो नमुद महीलांकरवी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक गिऱ्हाईकामागे त्यास ५००/- रुपये मिळतात असेही त्याने सांगीतले. त्यामुळे इसम नामे संतोष रोहीदास जगदाळे, वयः ४१ वर्षे रा. वीट, ता. करमाळा हा इसम वेश्याव्यवसायासाठी महीला पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुद्ध पो.हे.कॉ / १३७० महेश हंबीराव डोंगरे यांने फिर्याद दिल्याचे संतोष रोहीदास जगदाळे, वयः ४१ वर्षे रा. वीट, ता. करमाळा याचे विरुद्ध भा.न्या.सं. कलम १४३ (२), १४४ (२), सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५,६ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आले नंतर सदर आरोपीस रितसर अटक करून मे. कोर्ट बार्शी यांचे समक्ष हजर केले असता त्यास दिनांक ०७/५//२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे, सदर गुन्हयाचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने हे करीत आहेत, तसेच पिडीत महीला यांना मे. कोर्ट बार्शी येथे हजर करून, त्यांचे आदेशा प्रमाणे त्यांना रेणुका माता शासकीय महिला आश्रम होडगी रोड सोलापुर येथे सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे.सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि./ रणजीत माने, स.पो.नि./ पोपट टिळेकर, म.स.पो.नि./ म्हस्के, पो.उप.निरी. / चंदनशिव, स.पो.उप.निरी./ शिनगारे, पो. हवा./१५० लोहार, पो.हे.कॉ/१३० महेश डोंगरे, पो.शि./२१४० शिंदे, पो.शि./१७४८ घोगडे, म.पो.शि. /१६६ पारधी, पो.हवा./अजित उबाळे, पो.ना./११६२ मनिष पवार, पो.ना./९१२ वैभव ठेंगल, पो.शि. /१५५० तौफिक काझी, पो.शि./१७४८ ज्ञानेश्वर घोगडे, पो.शि./११४३ सोमनाथ जगताप, पो.शि. /८५६ अर्जुन गोसावी, पो.शि./२१४२ गणेश शिंदे, पो.शि./६८९ योगेश येवले, पो.शि./४३८ रविराज गटकुळ, पो.शि./१५२४ अमोल रंदील, म.पो.ना./१३१ शितल नाव्हकर यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा अनोखा उत्सव आकाश चिवटे यांच्याकडून १५० झाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश

" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…

2 days ago

करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुन रोजी‘आधार मेळावा नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – उदय बंडगर

करमाळा, प्रतिनिधी :  करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये  १३  जुनं रोजी आधार मेळावा  आयोजित केला असुन नागरिकांनी…

3 days ago

ब्राह्मण समाजाच्या संघटनासाठी केम येथे मेळावा; तरुणांनी समाज विकासासाठी पुढाकार घ्यावा – संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…

3 days ago

तुषार जाधव यांची शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

    करमाळा प्रतिनिधी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या…

4 days ago

दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महावि‌द्यालयास मान्यता

  करमाळा प्रतिनिधी दौंड तालुक्यातील अग्रगण्य दत्तकला शिक्षण संस्था संचलित "दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी" या…

4 days ago