Categories: करमाळा

करमाळा तालुक्याची वार्षिक आमसभा आमदार नारायण (आबा) पाटील यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.30 मेला नालबंद मंगल कार्यालय अहिल्यानगर रोड (बायपास) करमाळा येथे होणार -गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची सन २०२४-२०२५ची वार्षिक आमसभा मा.आमदार नारायण (आबा) गोविंदराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली वार शुक्रवार दिनांक ३०/०५/२०२५ रोजी सकाळी १०.३० नालबंद मंगल कार्यालय अहिल्यानगर रोड (बायपास) करमाळा येथे आयोजित केलेली आहे.  आमसभेमध्ये करावयाच्या प्रश्न / निवेदन /सुचना इत्यादीचे अर्ज दिनांक १७/०५/२०२५ अखेर पर्यंत पंचायत समिती करमाळा या कार्यालयाकडे लेखी किंवा karmalaaamsabha@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविणत यावेत तसेच दि.१७/०५/२०२५ नंतर कोणतेही प्रश्न / निवेदन /सुचना इत्यादीचे अर्ज सदर आमसभेमध्ये स्विकारले जाणार नाहीत. सदर आमसभेमध्ये सन २०२४-२०२५ मध्ये विकास कामाचा आढावा व सन २०२५-२०२६ मध्ये करावयाच्या कामाचे नियोजन केले जाणार आहे सदर सभेस सन्माननीय माजी सभापती, माजी उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.वि.कार्य सोसायटीचे चेअरमन व सचिव तसेच सर्व सहकारी कारखाना चेअरमन व संचालक मंडळ, ग्रामसेवक, तलाठी, खातेप्रमुख, केंद्रप्रमुख इ. यांनी आमसभेस वेळेवर उपस्थित राहावे.सदर सभेचे कामकाज सुरळीत पार पाडणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आमसभेचे सचिव, प्रशासक तथा गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago