Categories: करमाळा

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 14 मे रोजी करमाळा शहरामध्ये भव्य मिरवणूकीचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांची १४ में रोजी करमाळ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या करमाळा यांच्यावतीने 14 मे रोजी पोथरे नाका येथे सकाळी नऊ वाजता राज्यभिषेक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. दुपारी चार वाजता छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये आकर्षक मर्दानी खेळ, दांडपट्टा तलवारबाजी याचे प्रात्यक्षिक बाल गोपाळासह युवक वर्ग उपस्थित राहून विविध प्राचीन युद्ध कलेचे दर्शन सर्व करमाळाकरांना आपल्या कलेद्वारे घडवणार आहेत. श्रीराम समर्थ लाइट्स व रायगड डेकोरेशन यांचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. तरी या मिरवणुकीमध्ये तमाम शिवभक्तांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

23 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago