Categories: Uncategorized

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करमाळा मतदार संघातील प्रश्न‌ मांडणार-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील उद्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करमाळा मतदार संघातील प्रश्न‌ मांडणार असून‌ पारेवाडी सबस्टेशन‌ सक्षमीकरणासह अनेक कामांबाबत मागणी करणार असल्याचे आमदार कार्यालयाकडून सांगण्यात आले. उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत आमदार नारायण आबा पाटील हे उपस्थित राहुन काही महत्वाचे प्रश्न मांडणार आहेत. मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी कुर्डुवाडी शहर‌ पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आवाज उठवला होता. सदर‌ प्रश्न बैठकीत मांडल्याने जिल्हाधिकारी यांचेकडून सोडवण्यासाठी हाती घेण्यात आला. आता उद्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील ३३/११ केव्ही उपवीज केंद्रात पाच एम व्ही ए क्षमतेचा एक अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी आमदार पाटील यांच्या कडून‌ केली जाणार आहे. तसेच करमाळा कृषी विभागाच्या वतीने महाडीबीटी योजनेतील अर्जदार शेतकऱ्यांना अवजारे लाभ देण्यासाठी सोडत झाली नाही  याबाबत विचारणा केली जाणार आहे. कुंभेज येथील मंजूर असलेल्या ३३/११ केव्ही उपवीज केंद्राची उभारणी प्रक्रिया संथगतीने चालू असल्याने यावर आमदार नारायण आबा पाटील प्रकाश झोत टाकणार आहेत. कृषी विभागाच्या तुषार सिंचन/ ठिबक सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना अजून अनुदान दिले गेले नसल्याने हा प्रश्न मांडला जाणार आहे.उजनी पर्यटन विकास कामाची अजून सुरवात न‌ झाल्याने हा प्रश्न मांडला जाईल. तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल कडील ४.७०० किमी चारीचे रुंदीकरण पाहिजे तेवढे झाले नसल्याने या भागात पाणी देताना अडचणी निर्माण होत असल्याने हा प्रश्न मांडला जाईल. यासह इतर काही महत्वाचे प्रश्न आमदार नारायण आबा पाटील यांच्या वतीने मांडले जातील तसेच याबाबत लेखी निवेदने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले जातील असे आमदार कार्यालयाकडून
सांगण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago