करमाळा तालुक्यातील विकासा कामांच्या आड आम्ही येणार नाहीत असे विधान त्यांनी केले होते.आता मात्र बंद नलिकेतून पाणी नेल्यास पर्क्युलेशन होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे ते सांगत आहेत. वास्तविक पाहता ज्यावेळेस बंधनलिकेचे काम सुरू झाले होते त्यावेळेसच त्यांनी या गोष्टीला विरोध करून सदर बंद नलिका योजना रद्द करण्याची मागणी करणे गरजेचे होते. आम्हाला पाणी हवे आहे कुणालाही आमचा राजकारणासाठी विरोध नाही. फक्त आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे म्हणजे आमचा भाग सुजलाम सुफलाम होईल हीच आमची खरी मागणी आहे.
त्यामुळे संबंधित काम सुरू करण्यासाठी आमचे नेते माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या हक्काच्या मागणीसाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केले असून पोलीस प्रशासनाचेही आम्हाला मोठे सहकार्य लाभले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 30 मे पर्यंत संबंधित सुरू करणार असल्याचे दहिगाव उपसा सिंचन चे उपअभियंता संजय राजगुरू यांनी लेखी आश्वासन दिले आहे.पाईप जाळणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन आम्हाला दिले असल्याने आंदोलन स्थगित करत असल्याचे भरत भाऊ अवताडे यांनी सांगितले आहे.अर्जुन नगर फाटा येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलन शांततेचे शांततेत संपन्न झाले पोलीस निरीक्षक रणजीत माने साहेब चो बंदोबस्त ठेवला होता. 30 मे पर्यंत सदर आश्वासन पूर्ण न झाल्यास 5 जून रोजी विधानभवनावर घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे त्यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…