Categories: Uncategorized

ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी करमाळा येथे 18 मे रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी भारतीय सैनिकांनी भारत मातेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवून 26 निष्पा बळी गेलेल्या भारतीय नागरिकांचा बदला घेऊन दहशतवादी व त्यांच्या म्होरक्या अड्ड्यांचा खात्मा केला आहे. आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या प्रति कृतज्ञता आभार व्यक्त करण्यासाठी भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा रविवार दिनांक 18 5 2025 रोजी पाच वाजता किल्ला वेस येथून तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. .करमाळा तालुक्यातील प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी देशाच्या सन्मानाला तो भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी सहभागी व्हावे .सदर तिरंगा यात्रा किल्ला वेस, फुलसौदर चौक ,जय महाराष्ट्र चौक ,सुभाष चौक, दत्त पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सदर रॅलीचा समारोप होणार आहे. तरी भारतीय सैनिकाच्या सन्मान रॅलीसाठी करमाळा तालुक्यातील देशप्रेमी भारतीय नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

22 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago