Categories: Uncategorized

माझ्या इतकी वीजेची कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत, तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजेची कमतरता भासू देणार नाही-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी माझ्या इतकी वीजेची कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत, तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजेची कमतरता भासू देणार नाही असे ठाम प्रतिपादन करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. शेटफळ (नागोबाचे) ता करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शेटफळ येथील ३३/११ उपवीज केंद्राचे सक्षमीकरण करण्यासाठी येथे पाच एम व्ही क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे कामाचे भूमिपूजन आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ बापू लबडे हे होते तर व्यासपीठावर आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, नुतन संचालक महादेव पोरे, दत्तात्रय देशमुख, हणुमंत सरडे,, राजाभाऊ कदम, श्रीमान चौधरी, रामेश्वर तळेकर तसेच चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, नामांकित किर्तनकार हभप विठ्ठल महाराज पाटील, भागवत गुंड, बाजार समिती संचालक दादासाहेब लबडे, उपसरपंच अजित नाईकनवरे, माजी उपसरपंच बाळासाहेब गुंड, जयनाथ पोळ, राजेंद्र नाईकनवरे, आण्णा लबडे, विलास आप्पा लबडे, हरीभाऊ सरकाळे, कैलास नाईकनवरे बाळासाहेब लबडे, बापू गुंड, महादेव गुंड, नागनाथ गुड़बाळासाहेब , युवराज नाईकनवरे, बन्सीमामा चोरगे, सोपान काका निंबाळकर, सोमनाथ गुंड, बाबू गुंड,, नवनाथ गुटाळ, नागनाथ साबळे, कालीदास नलवडे, महाराष्ट्र राज्य रोप वे मल्लखांब असोसिएशन सचिव पांडुरंग वाघमारे सर आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की कृषी पंपाच्या वीज कनेक्शन साठी आता डिपी दिले जात नाहीत, सोलरचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिला जातोय. परंतू सोलरच्या माध्यमातून वीजेसाठी शेतकरी स्वावलंबी होईलच असे नाही. ज्याच्या त्याच्या क्षेत्र गणतीनुसार वीजेची मागणी चालूच राहणार आहे. येत्या काही दिवसांत दहिगाव व लव्हे येथेही पाच एम व्ही क्षमतेचे अतिरिक्त फिडर बसवले जाणार आहेत. वांगी १ येथेही लवकरच पाच एम व्हीचा आणखी एक फिडर कार्यान्वित होईल. कुंभेज येथील नियोजित मंजुर असलेल्या ३३/११ उपवीज केंद्राची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता पुढील उभारणीचे कामही लवकरच सुरू होईल. ढोकरी येथेही ३३/११ उपवीज केंद्राची उभारणी होईल. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण खंबीर असल्याने आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवले. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले. तर यावेळी हभप विठ्ठल महाराज, संचालक राजाभाऊ कदम, सरपंच विकास गलांडे आदिंची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार उपसरपंच आनंद नाईकनवरे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

21 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago