Categories: करमाळा

करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू उपसा व वाहतुक करणारे इसमावर कारवाई करुन १९ ब्रास वाळु व एक टेम्पो ४,९०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त

करमाळा प्रतिनिधी पोलीस निरीक्षक रणजीत माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस स्टेशनने दमदार कामगिरी करून अवैध वाळू उपसा व वाहतुक करणारे इसमावर कारवाई करुन १९ ब्रास वाळु व एक टेम्पो ४,९०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १६/०५/२०२५ रोजी पो.नि. / रणजीत माने यांना गोपनीय माहिती मिळाळी की, मौजे वांगी नं. ३, ता. करमाळा येथे चोरुन वाळू वाहतुक सुरु आहे अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करणे करीता उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. अजित पाटील साहेब. उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा यांना माहीती देवून छापा कारवाई करीता पो.नि./ रणजीत माने, पो.ना./१७६८ प्रमोद गवळी, पो. ना./११६२ मनिष पवार, पो.ना./९१२ वैभव ठेंगल, पो.शि./११४३ सोमनाथ जगताप, पो. शि./८५६ अर्जुन गोसावी, पो.शि./४३८ रविराज गटकुळ, पो.शि./१७४८ ज्ञानेश्वर घोंगडे, पो.शि./११५३ आलदर, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे व दोन पंच असे बातीमीचे ठिकाणी जावुन मौजे वांगी नं. ३, ता. करमाळा येथील नदीपात्राकडे जात असताना काही अंतरावरुन इसम नामे सुहास उर्फ सिध्दु भारत तावसे व राजेश महेंद्र रोकडे असे वाळुने भरलेला टेम्पो घेवुन तेथुन पळून गेले. त्याचा पाठलाग करीत उजनी जलाशयाकडे जात असताना समोरुन टाटा कंपनीचा टेम्पो क्र. एम.एच.-१०/के.-८२१८ हा दिसल्याने त्यास पोलीसांनी त्यांची गाडी आडवी लावली असता त्या टेम्पोचा चालक आनंद सुखदेव सातव, रा. वांगी नं. ३, ता. करमाळा हा टेम्पो सोडुन तेथुन पळुन गेला. सदर टेम्पोमध्ये १ ब्रास वाळु मिळुन आली.
तसेच सदर इसमांनी उजनी जलाशयाच्या कडेला वाळूचा उपसा करुन ढिगारा घातल्याचे दिसुन आल्याने त्याबाबत पंचनामा करुन वरील इसमांवर करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं. ३९२/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३ (५), सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९ व १५ प्रमाणे १) सुहास उर्फ सिध्दु भारत तावसे, २) राजेश महेंद्र रोकडे व ३) आनंद सुखदेव सातव, सर्व रा. वांगी नं. ३, ता. करमाळा यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये अंदाजे १,८०,०००/- किंमतीचा अंदाजे १८ ब्रास वाळुचा ढिगारा, अंदाजे ३,१०,०००/- रु. किंमतीचा टाटा ४०७ टेम्पो क्र. एम.एच.-१०/के. -८२१८ त्यात अंदाजे १ ब्रास वाळु असा एकुण ४,९०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि./ रणजीत माने, पो.ना./१७६८ प्रमोद गवळी, पो.ना./११६२ मनिष पवार, पो.ना./९१२ वैभव ठेंगल, पो. शि./११४३ सोमनाथ जगताप, पो.शि./८५६ अर्जुन गोसावी, पो.शि./४३८ रविराज गटकुळ, पो.शि./१७४८ ज्ञानेश्वर घोंगडे, पो.शि. /११५३ विलास आलदर, चा. पो.शि./६२ राहुल माने यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

22 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago