करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उजनी धरण क्षेत्रासह सर्व नदी, तलावाचे ठिकाणी स्थानिक मच्छीमार मोठया प्रमाणात असुन, स्थानिक मच्छीमार यांचेवर कारवाई होत असले बाबत मच्छीमार बांधवांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. काही लोक स्थानिक मच्छीमारांपेक्षा परराज्यातील मच्छीमारांना आणून वडाप द्वारे मासेमारी करत आहेत. त्यामुळे पर्यायाने स्थानिक मच्छीमार बांधवांना देखिल वडाप द्वारे मासेमारी करावी लागते. आपल्या धरणक्षेत्रात दरवर्षी कोट्यावधी मत्सबीज सोडले जाते. त्यामुळे मासेमारी करताना प्रत्येकाने लहान मासा न पकडता परत पाण्यात सोडावा जेणेकरून मत्सबीजांचे संवर्धन होईल. परंतु या गोष्टी फक्त स्थानिक मच्छीमार कटाक्षाने पाळतात मात्र परराज्यातील मच्छीमार लहान माशांसहीत वडाप ओढतात. सध्या वडाप मासेमारीला बंदी असुन, जर धरणावरील वडाप मासेमारी बंद करायची असलेस प्रथम परराज्यातील मासेमारी करणारांची वडाप मासेमारी थांबवावी स्थानिक मच्छीमारांवर लगेच कारवाई करू नये. याबाबत आपण माजी आमदार संजयमामा शिंदे साहेबांशी बोलून स्थानिक मच्छीमार बांधवांच्या व्यथा शासन दरबारी मांडणार असुन त्यांना न्याय मिळवून देणार आहे व राष्ट्रवादी काँग्रेस कायमच स्थानिक मच्छीमार बांधवांच्या पाठीशी राहील असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते ॲड अजित विघ्ने यांनी मांडले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…