संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिरक महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त २१ मे रोजी करमाळा येथे लहान मुलांच्या हृदयावरील आजार तपासणी व शस्त्रक्रियाची मोफत शिबिर

करमाळा प्रतिनिधी 

संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिरक महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त करमाळा येथे लहान मुलांच्या हृदयावरील आजारावरील तपासणे व शस्त्रक्रियाची मोफत शिबिर
बुधवार 21 मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे होणार असून या शिबिराचा फायदा सर्व हृदयरोग विकार असलेल्या लहान बालकांनी घ्यावा असे आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.एक ते सात वर्षापर्यंतच्या लहान मुलांना हृदयाला होल असणे
हृदयाची झडप बंद असणे.हृदयाचा त्रास असणे अशा समस्या असतात.याची तपासणी करण्यासाठी बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील तज्ञ डॉक्टर उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे येणार आहेत.ज्या बालकांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे
या बालकांच्या शस्त्रक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत करून देण्यात येणार आहेत.करमाळा तालुक्यातील व परिसरातील ज्या लहान बालकांना हृदयाचे त्रास आहेत अशांनी आपली नाव नोंदणी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे करावीया शिबिराच्या उद्घाटनासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीक सहाय्यक मंगेश चिवटे
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे
जे जे युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे,जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड,ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष सुजित बागल
यश कल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील
महात्मा फुले समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रमोद भाऊ झिंजाडे
करमाळा तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य,संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित चिवटे,माजी उपनगराध्यक्ष एडवोकेट कमलाकर वीर,शिवसेना प्रवक्ते एडवोकेट शिरीष लोणकर,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे,तालुकाप्रमुख अनिल पाटील
ओबीसी महासंघाचे शिवसेना अध्यक्ष अंकुशराव जाधव
उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे,बाळासाहेब वाघ
युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई शिंदे,शहर प्रमुख कीर्ती स्वामी
आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे
@@@
डॉक्टर गजानन गुंजकर
वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय करमाळा
अशा प्रकारचे शिबिर पहिल्यांदाच होत असून लहान मुलांना असणाऱ्या हृदयाच्या समस्या व त्यावर शस्त्रक्रिया यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागतो.मात्र या शिबिराच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करणार असल्यामुळे ज्या बालकांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी या शिबिरात उपस्थित राहावे व आपली डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
@@@@@

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago