Categories: Uncategorized

माथाडी कामगारांचा विविध मागण्यांसाठी मुंबई येथे लाक्षणिक उपोषण सत्याग्रह आंदोलन संपन्न : – ॲड. राहुल सावंत

माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समिती यांच्यावतीने आंदोलन संपन्न

करमाळा प्रतिनिधी : – माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव व कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील यांच्या आदेशानुसार 20 मे 2025 रोजी , कामगार आयुक्त, मुंबई येथे कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे, सरचिटणीस बळवंत पवार, सरचिटणीस सुभाष लोमटे, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ तसेच माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण संपन्न झाले, अशी माहिती करमाळा तालुका हमाल पंचायत अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी दिली.
यावेळी आंदोलन मध्ये माथाडी कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. पेन्शन सर्व कष्टकऱ्यांना विनासहभागी मिळालीच पाहिजे. राज्यातील माथाडी मंडळे कार्यक्षम झालीच पाहिजेत. या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
याचे निवेदन कामगार आयुक्त मुंबई आणि अप्पर कामगार आयुक्त मुंबई यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देताना आमदार शशिकांत शिंदे, अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, डी एस शिंदे, अरुण रांजणे, शिवाजी शिंदे ,श्रीमती नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, शिवाजीराव शिंदे, हनुमंत बहिरट, आप्पा खताळ, गोरख मेंगडे, ॲड. राहुल सावंत, गोरख जगताप, भिमराव सिताफळे, बागल कुर्डुवाडी, उपस्थित होते.
वरील विषयास अनुसरून की, नवीन माथाडी सुधारणा कायद्‌यातील सदर कायदा कोणत्या कामगाराला लागू होणार याबाबत पूर्वीच्या शब्द रचनेत बदल केल्याने अगोदरच क्षीण अंमलबजावणी आणखीन क्षीण होण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. शिवाय राज्य माथाडी सल्लागार मंडळाचे अधिकार राज्य शासनाने स्वतःकडे घेतल्याने धनाढ्य व्यक्तीचा माथाडी कायदा अंमलबजवणीवर प्रभाव पडण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे सांगितले. शिवाय माथाडी काय‌द्याची स‌द्याची माथाडी अंमलबजावणीचा आढावा घेताना पदाधिकारी यांनी माथाडी काय‌द्याची राज्यात सार्वत्रिक काटेकोर अंमलबजावणी कडे माथाडी मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. यात माथाडी मंडळावर स्वतंत्र अध्यक्ष सचिवांच्या नियुक्त्या, कर्मचारी भरती या बरोबरच हमाली तोलाई दर ठरवण्या बाबत, वसूली कारवाई, शासकीय धान्य गोदामातील रोजगार वाचवण्याबाबत राज्यातील माथाडी मंडळाचा कमजोरपणा, खाजगी बाजारासह सहकार व पणन विभागाशी संबंधीत.
कामगार विभागाचे माथाडी काय‌द्याच्या अंमलबजावणी कडे लक्ष वेधण्यासाठी तसेच राज्य शासनाचा नवीन माथाडी सुधारणा काय‌द्या बदल रद्द करण्यासाठी तसेच माथाडी काय‌द्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, सर्व कष्टकऱ्यांना विनासहभागी पेन्शन मिळलीच पाहिजे, राज्यातील माथाडी मंडळे कार्यक्षम झालीच पाहिजेत, माथाडी कामगारांना घरकुल मिळाली पाहिजे या मागण्यासाठी माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य सोबत आम्ही करमाळा तालुका हमाल पंचायत, करमाळा चे पदाधिकारी दि.२० मे २०२५ रोजी कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई येथे लाक्षणीक उपोषण , धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कामगार आयुक्त व कृती समितीचे पदाधिकारी यांची सुमारे दीड तास चर्चा होऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago