Categories: करमाळा

गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचे शिक्षक उत्तम हानपुडे सर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचे शिक्षक उत्तम हनपुडे यांना आदर्श शिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केल्याबद्दल व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष अविनाश संकुले सचिव गणेश विटकर यांच्या उपस्थितीमध्य देव माणूस फेमा अभिनेत्री पुष्पाजी चौधरी यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या दिमागदार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
 उत्तम हानपुडे सर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गाव समृद्ध करण्याबरोबरच स्वच्छता अभियान व महसूल योजना राबवून सोलापूर जिल्ह्यात  आदर्श गाव म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सन 2018 ते 2000 पर्यंत काम केले असून माध्यमिक शिक्षक संघटनेचे 2003 मध्ये सभासद होऊन सन 2004 ते 2009 करमाळा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड होऊन शिक्षकांच्या प्रश्नासाठी हे आजपर्यंत निरपेक्षपणे काम करीत आहेत सत्संग 2015 पासून वधू वर सूचक केंद्र च्या माध्यमातून त्यांनी 218 विवाह संपन्न केले असून 13 विवाह पुनर्विवाह करण्याचे काम त्यांनी केले आहे शालेय उपक्रमांतर्गत 2000 पासून आज पर्यंत झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर आणि थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांनी राबवले आहे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत पुणे विभागात तृतीय क्रमांक मिळवला आहे शिक्षकी व्यवसाय सांभाळून उल्लेखनीय काम करणाऱ्या उत्तम आणि पुढे यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक संघटनेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनवणे सर जिल्हा सहसचिव यशवंत तिवारी तालुकाध्यक्ष प्रताप बरडे सर,टी डीएफ संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण किरवे सर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

10 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

13 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

16 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

17 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

17 hours ago