Categories: करमाळा

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे – ॲड. राहुल सावंत

 

ज्या कुटुंबाला आजपर्यंत घरकुलाचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांनी सर्व्हेक्षण करावे

करमाळा प्रतिनिधी : – प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ज्या कुटुंबाला आजपर्यंत घरकुल योजना चा लाभ मिळाला नाही अशा गरजू लाभार्थ्यांनी 31 मे 2025 पर्यंत आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व्हेक्षण करून घ्यावे किंवा स्वतःआवास प्लस 2024 सर्व्हेक्षण या ॲप द्वारे सर्व्हेक्षण करून घ्यावे असे आवाहन पंचायत समिती माजी सदस्य व श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत यांनी केले आहे.
तसेच प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या गावातील सर्व्हे पारदर्शक करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल यासाठी प्रयत्नशील रहावे आणि आपल्या गावातील एकही लाभार्थी यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी ग्रामीण भागात बेघर , कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2025 सर्व्हेक्षण करमाळा तालुक्यात सुरू आहे. या सर्व्हे साठी शासनाने पुन्हा 31 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत किंवा स्वतः आवास प्लस 2024 सर्व्हेक्षण या ॲप द्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणासाठी 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जी कुटुंब अद्याप ही सर्व्हेक्षण पासून वंचित आहेत त्यांनी सर्व्हेक्षण करून घेण्यात यावे . कोणत्याही लाभार्थ्यांला अडचण आली तर त्यांनी माझ्याकडे संपर्क साधावा असे आवाहन ॲड. राहुल सावंत यांनी केले आहे.

   

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago