Categories: करमाळा

दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी आँनलाईन प्रवेश सुविधेचा लाभ घ्यावा-प्रा.रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी दहावी‌नंतर  शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य सरकारने केली असून या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन‌‌ दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळसर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नुकता दहावीचा निकाल लागला असून ‌ विद्यार्थ्यांची कला वाणिज्य सायन्स या शाखांना प्रवेश करण्याबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही ‌ शिक्षण घेण्यासाठी ‌ ऑफलाइन पद्धत ‌ शासनाने बंद करून ऑनलाईन पद्धतीने ‌ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या प्रवेशासाठी निकाल जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आवश्यक असणारं आहे.
आपला आँनलाईन प्रवेश करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था पात्र असुन 9 000 विद्यालयामधून साडेचार लाख विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन प्रवेश घेणार आहेत.
महाराष्ट्र राज्या शासनाने ‌ विद्यार्थी पालक ‌ यांच्या हिताचा निर्णय घेतला असून या पद्धतीमुळे पालकाची होणारी धावपळ थांबणार आहे तसेच वेळ पैसा श्रम वाचणार आहे. याकरिता आयटीआय पर्याय असून डिप्लोमा नंतर रोजगार करता इंजिनिअरिंगला प्रवेश ‌ घेता येणार आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यावसायिक शिक्षणाची गरज ओळखून पॉलिटेक्निकला प्रवेश घेणे गरजेचे आहे. या प्रवेशासाठी आरक्षणात महत्त्वाची असून एकूण सर्व जातींना 72 टक्के आरक्षण असून खुल्ला प्रवर्गात 28 टक्के आरक्षण असणार आहे ‌. मॅनेजमेंट कोटा 5 टक्के ‌व इतर दहा टक्के कोटा असणार आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांनी या गोष्टी लक्षात घेऊन ‌ आपल्या जवळच्या वसईनुसार कॉलेजला प्रवेश घ्यावा याकरता पसंती क्रमांका नुसार आपणाला ‌ चार राऊंडमध्ये ‌ प्रवेश प्रक्रिया असणारा असून ‌ त्यामध्ये ‌ एकाच वेळी राज्याची यादी आपल्या गुणवत्ते सोबत नुसार लागणार आहे ‌. ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी त्या कॉलेजला प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे तसेच उर्वरित ज्यांचा प्रवेश राहिला असेल त्यांना त्यांच्या सोयीनुसार प्रवेश घेता येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे  शिक्षण तंत्र मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी शैक्षणिक समानतेच्या धोरणावर आपण चर्चा केली असून विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती वस्तीगृह रस्ता याकरता समानता आणण्यासाठी शासन व आम्ही प्रयत्नशील आहे तसेच शासनाचा शैक्षणिक संस्थांना भरावा लागणारा कर एक सारखा असावा तसेच विद्यार्थ्यांना तुला पद्धतीने शैक्षणिक सुविधा कशा प्रदान करता येतील याविषयी शासनाबरोब‌र‌‌ त्या गोष्टींचा पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी ‌‌ बारावीनंतर ‌ ऑनलाइन पद्धतीने ‌ आपला प्रवेश अनुदानित विनाअनुदानित बघूनच प्रवेश घ्यावा अशी आव्हान दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यपक रामदास झोळसर यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

7 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

11 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

13 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

14 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

14 hours ago