करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील 3 जिल्ह्यांच्या सिमेवर असणारा ब्रिटीश कालीन डिकसळचा पुल खचला आणि जड वाहतुक बंद झाली होती. सदर पुलाची किरकोळ दुरुस्ती करून हलक्या वाहनांची वाहतूक सदर पुलावरून सुरु होती ,परंतु करमाळा तालुक्यासह पुणे, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ पुलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून 55 कोटी रुपयांची मंजुरी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मिळवली होती. त्यानंतर किती सरकारने त्यावरती स्थगिती आणली.ती स्थगिती उठल्यानंतर जुलै 2023 मध्ये सदर कामाची प्रशासकीय मान्यता मिळून 2024 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली .
कामाची मंजुरी, त्यावरती दिली गेलेली स्थगिती, स्थगिती उठविणे, प्रशासकीय मान्यता, निधीची तरतूद, नैसर्गिक अडथळे (धरण भरणे) आदी कारणांमुळे 36 महिन्यांपैकी 20 महिन्याची मुदत संपलेली आहे काम समाधानकारक नाही, परंतु सध्या आपण सरकारमध्ये नसलो तरीही संबंधित कामाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असून अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून या कामाला कुठलीही अडचण येऊन देणार नाही असे आश्वासन डिकसळ पूल पाहणी प्रसंगी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले. यावेळी बारामती ॲग्रो कारखान्याचे व्हा.चेअरमन,मा.सुभाष आबा गुळवे व संबंधित ठेकेदाराचे मॅनेजर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…
करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…
करमाळा प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…