Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी अवैध देशी-विदेशी दारु वाहतुक करणारे इसमावर कारवाई करुन ५,४७,०१४/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी-विदेशी दारु वाहतुक करणारे इसमावर कारवाई करुन ४७,०१४/- रु. किंमतीची दारु व एक महिंद्रा बोलेरो गाडी असा एकुण ५,४७,०१४/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २६/०५/२०२५ रोजी पो.नि./ रणजीत माने यांना गोपणीय माहिती मिळाली की, केम ते वडशिवणे रोडने एक चारचाकी गाडी अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करीत येणार आहे अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करणे करीता मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. अजित पाटील साहेब. उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा यांना माहीती देवून कारवाई करीता पो.हवा./१८४५ अलिममलिक शेख, पो.शि./२००७ अमोल घुगे व पो.शि./१३२९ प्रविण चव्हाण, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे यांना सुचना देवुन खाना केले. ते मौजे केम गावचे ह‌द्दीतील वेताळबाबा मंदीराजवळ जावुन थांबले असता त्यांना एक चारचाकी महिंद्रा बोलेरो गाडी येत असताना दिसली. तीचा त्यांना संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवुन गाडीची तपासणी केली असता त्यात एकुण ४७,०१४/- रु. किंमतीचे देशी-विदेशी दारुचे बॉक्स व त्यामध्ये देशी-विदेशी दारुच्या बाटल्या मिळुन आल्या. तसेच सदर गाडीचे चालक सदाशिव अजय मराठे, वयः २८ वर्षे, रा. निमगाव (टें), ता. माढा, जि. सोलापूर यास तसेच अंदाजे ५,००,०००/- रु. किंमतीची एक महिंद्रा बोलेरो गाडी क्र. एम.एच.-४५/ए.क्यु.-४७५९ असा एकुण ५,४७,०१४/- रु. किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी ताब्यात घेवुन त्याचेवर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नि. रणजीत माने, पो. हवा./१८४५ अलिममलिक शेख, पो.शि. /२००७ अमोल घुगे व पो.शि./१३२९ प्रविण चव्हाण. करमाळा पोलीस ठाणे यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

6 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

10 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

12 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

13 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

13 hours ago