Categories: करमाळा

आमदार नारायण आबा पाटील यांचा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर भेट देऊन पाहणी

. आमदार नारायण आबा पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन प्रत्यक्षात पिक पाहणी केली असुन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे मागणी केल्याचे सांगण्यात आले. करमाळा मतदार संघात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेले दोन आठवडे झाले पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे आज करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिवसभर नुकसानग्रस्त भागात गावभेट दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत तालूका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी मधुकर मारकड, कृषी सहायक बाबुराव बेरे, कृषी सहायक नितीन रांजून, कृषी सहायक सुप्रिया शेलार, कृषी सहायक राहुल गव्हाणे, कृषी सहायक सचीन सरडे, सभापती अतुल भाऊ पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे,आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, आदिनाथ संचालक हनुमंत सरडे, विजयराव कोकरे, अजित ननवरे, कैलास बोंदरे आदि उपस्थित होते. या दौऱ्यात शेटफळ येथील शेतकरी रंगनाथ पोळ, मुकूंद पोळ, विजय रामचंद्र लबडे, अनिल प्रल्हाद पोळ तर चिखलठाण येथील शिवाजी नारायण जगताप, कुगाव येथील बळीराम जनार्दन सरडे, प्रशांत लक्ष्मण कामटे आदि शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या केळी, डाळींब, उडीद, कांदा आदि पिकांची प्रत्यक्षात पाहणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधुन दिलासा दिला.यावेळी पावसामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाण्यासाठी रस्ते नसताना आमदार नारायण आबा पाटील यांनी वेळप्रसंगी ट्रॅक्टर मध्ये बसून तर काही ठिकाणी चिखल तुडवत चालत जाऊन बांधावर‌ हजेरी लावली व शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नुकसानीचे अहवाल तयार करुन वरीष्ठ कार्यालयात ते सादर करावेत अशा सुचना दिल्या. तसेच करमाळा तालुक्यातील गावांसह या मतदार संघास जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातही अनेक शेतकऱ्यांची उभी पिके अवकाळी मुळे हातातून गेली असून काही ठिकाणी काढणी केलेला कांदा रानात ढिग करुन ठेवले असल्याने तेही हाती लागले नसल्याचे सांगत जिथे मी जाऊ शकत नाही अशा मतदार संघातील सर्वच नुकसानग्रस्त भागात कृषी व महसुल विभागाचे अधिकारी जाऊन अहवाल तयार करतील, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रसांगवधान दाखवून तातडीने केलेल्या या भेट व‌ पाहणी दौऱ्यामूळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

6 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

10 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

12 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

13 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

13 hours ago