Categories: Uncategorized

करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा राजकारणात दबदबा कायम


करमाळा प्रतिनिधी
माजी आमदार असताना सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री संजय मामांच्या निवासस्थानी भेट देतात .त्यांचा आदरसत्कार स्वीकारतात यावरून संजयमामा शिंदे हे एक वेगळं रसायन आहे याची प्रचिती करमाळा तालुक्याला यायला लागली असून मतदारसंघातील गावागावात, गल्लीगल्लीत, घराघरात फक्त संजय मामांचीच हवा असल्याचे चित्र सध्या तालुक्यात स्पष्टपणे दिसत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय मामा शिंदे हे नाव अडगळीत पडेल या पद्धतीने विरोधकांनी रणनीती आखली आणि आदिनाथ कारखाना निवडणुकीतही संजयमामांना पराभव चाखायला भाग पाडले. या साऱ्या घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकारमधील ना .अजित दादा पवार व ना.माणिकराव कोकाटे दोन वजनदार मंत्री मामांचे घरी भेट देतात हे विशेष आहे अशी चर्चा सध्या तरुणाई करत आहे.
आदिनाथ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने बारामती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे आणि संजय मामा शिंदे यांनी अजित दादा पवार यांची भेट घेतल्यानंतर विरोधकांकडून यावरती टीकास्त्र करताना त्यांना दोन मिनिट सुद्धा वेळ दिला नसेल, त्यांना हाकलून लावला असेल अशा पद्धतीची टीका टिप्पणी जाहीर सभांमधून केली गेली होती. त्यानंतर अवघ्या आठच दिवसांमध्ये संजय मामांचे निवासस्थानी नामदार अजितदादा पवार यांनी भेट दिली होती. त्यावेळेस त्याचीही चर्चा सर्वत्र झाली होती. परवा
कृषी मंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा होता. परंतु पावसामुळे सदर दौरा रद्द होऊन सुद्धा आमदार माणिकराव कोकाटे यांनी संजय मामा शिंदे यांचा पाहुणचार स्वीकारला. विद्यमान आमदार यांना टाळून माजी आमदार यांच्या निवासस्थानी मंत्र्यांनी भेट देणे हे विशेषच आहे.
यावेळी मामांनी शेलगांव(वांगी) ता.करमाळा येथे केळी संशोधन केंद्र होणेबाबत प्रामुख्याने मागणी करुन प्रलंबित ड्रिपचे अनुदान त्वरित मिळावे,कांदाचाळी ज्यांच्या बांधून पूर्ण आहेत त्यांचे अनुदान,महा डिबीटी बंद आहे ते त्वरित चालू करावे, त्याचबरोबर शेतकरी यंत्र सामग्री अनुदान वाढवून मिळावे या प्रमुख मागण्या केल्या.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago