पत्रकार कुटुंबांसाठी ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’
पत्रकारांच्या मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. पत्रकारांचे जीवन धकाधकीचे आणि तणावपूर्ण असल्याने त्यांच्या कुटुंबाकडे, विशेषतः मुलांकडे, वेळ देणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर ही संस्था शिक्षण, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, मूल्यसंस्कार, कला-क्रीडा आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त उपक्रम राबवणार आहे.
पुरस्कार विजेते – महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५
सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कारार्थी:
* डॉ. किरण सावे, पालघर – आदिवासी शिक्षण
* बिग हिट मीडिया – अनुष्का सोलवट, ऋतिक मणी, अनिल मणी
* सचिन वायकुळे, बार्शी – तृतीयपंथीय आणि देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी कार्य
* डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, कंधार – शिक्षण व ग्रामविकास
* उमाकांत मिटकर, नळदुर्ग – भटक्या-विमुक्त विकास
* मोहन डांगरे, सोलापूर – महिला सक्षमीकरण
* प्रशांत मोरे, महाबळेश्वर – युवा उद्योजक
* संजय कोठारी, जामखेड – सामाजिक कार्य
* नामदेवराव खराडे – साखर उद्योग
* स्वप्निल परदेशी – चिक्की उद्योग
* विजय राऊत – शिक्षण, क्रीडा, साहित्य
* संदीप शिंदे – बेघर मनोरुग्ण पुनर्वसन
* शिवराम घोडके – प्रगत शेती
* आतिश शिरसाट – बेवारस मनोरुग्ण पुनर्वसन
* भास्कर घुले – श्री विघ्नहर साखर कारखाना
* संतोष ठोंबरे – ग्रामविकास
* मानसिंगराव चव्हाण – सहकारी साखर उद्योग
* शुभम पसारकर – दिव्यवंदना आधार फाउंडेशन
पत्रकारिता पुरस्कार:
* सरिता कौशिक – एबीपी माझा
* साहिल जोशी – मुंबई तक
* संजीव उन्हाळे – ज्येष्ठ पत्रकार
* भारत चव्हाण – लोकमत
* दिलीप सपाटे – मंत्रालय वार्ताहर संघ
डिजिटल स्टार पुरस्कार:
* नितीन पाटील – पोलीसनामा
* अश्विनी जाधव – लोकमत डिजिटल
* अभिजीत दराडे – मटा डिजिटल
* विष्णू सानप – लेटसअप
* ओमकार वाबळे – मुंबई तक
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या संयोजन समितीतील सदस्य,पदाधिकारी सतीश सावंत, महेश कुगांवकर, नंदकुमार सुतार, केतन महामुनी, शामल खैरनार, राजू वाघमारे, विकास भोसले, तेजस राऊत, इक्बाल शेख, दिपक नलावडे, अमोल पाटील, अजिंक्य स्वामी, गणेश हुबे, प्रशांत साळुंके यांची देखील उपस्थिती होती.
राज्यातील १२,००० डिजिटल पत्रकारांना मिळणार २ लाख रुपयांचे विमा संरक्षण; मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा
पुणे | प्रतिबिंब प्रतिष्ठान आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण समारंभात एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील १२,००० डिजिटल पत्रकारांसाठी २ लाख रुपयांच्या अपघाती विमा संरक्षण योजनेची घोषणा केली.
पत्रकारांच्या अनिश्चित आणि अल्प उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर ही विमा योजना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, डिजिटल पत्रकारांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून संवेदनशील पावले उचलली जातील. मध्य प्रदेशने ज्या सवलती दिल्या आहेत त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन महाराष्ट्रात योजना राबवली जाईल.
ही विमा योजना प्रत्येक पत्रकाराच्या १०,००० रुपयांच्या एफडीच्या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. त्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी ४० रुपये अपघाती विमा आणि ५२० रुपये आरोग्य विमा प्रीमियम भरण्यात येणार आहे. अपघाती मृत्यू अथवा अंगविकृती झाल्यास संबंधित पत्रकाराच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.
मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, “पत्रकारांचे उत्पन्न मर्यादित आहे. त्यांचे पाल्य शिक्षण कसे घेतील, आई-वडिलांचा औषध खर्च कसा भागवतील, यासाठी सरकारने त्यांच्या पैशांची बचत करणे म्हणजेच कमाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा योजनांची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे.
ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी ट्रस्ट व देणगीदारांची मदत घेण्यात येणार असून, ही योजना केवळ घोषणा राहणार नाही तर प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे,असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले.
या घोषणेसह पत्रकारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चा लोकार्पण सोहळा आणि *महाराष्ट्र महागौरव पुरस्कार* समारंभ पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, संपादक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…