Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी -चोरीच्या व फसवणूकीच्या गुन्हयातील ४.५ तोळे सोन्याचे, सुमारे ४ लाख रुपये किंमतीचे दागिने आरोपीकडून जप्त एकूण ०३ चोरीचे फसवणूकीचे गुन्हे उघडकीस

 


करमाळा प्रतिनिधी दि. १६/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०४/३० वा चे सुमारास करमाळा शहरातील दत्तपेठ येथे महिला सरुबाई मारुती शिंदे, वय ६० वर्षे, रा. मांगी, ता. करमाळा या पायी चालत जात असताना दोन अनोळखी इसम आले व त्यांनी फिर्यादीला तुमच्या गळयात कमी सोने आहे, त्याबददल आम्ही जास्त सोने देतो असे म्हणून त्यांनी फिर्यादीला एक पिवळया धातूचे बिस्कीट दिले व फिर्यादीच्या गळयातील ०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले व ०२ ग्रॅम वजनाचे कानातील फुले असे एकूण ०१ तोळे वजनाचे सोने काढून घेतले व फिर्यादीला सोन्याचे बिस्कीट म्हणून पितळेचे बिस्कीट देवून दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीची फसवणूक केली आहे म्हणून वगैरे मजकुराचा गुन्हा या करमाळा पोलीस ठाणेस गु, र. नं. ३९९/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे फिर्याद दाखल आहे.
सदर फिर्यादीच्या अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने सो. यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना बोलावून घेवून त्यांची दोन पथके तयार करुन घटनेच्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करुन घेतली, तसेच सदर घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करुन तसेच सदर सी सी टी व्ही फुटेज बाहेर जिल्यातील पोलीस ठाणेस पाठवून मिळाल्या माहीतीनुसार अहिल्यानगर जिल्यामध्ये दोन पथके रवाना केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांनी अहिल्यानगर जिल्यामध्ये जावून पाथर्डी पोलीस ठाणे हददीतील मौजे भालगाव, ता. पाथर्डी येथे जावून संशयीत आरोपीच्या घरावर पाळत ठेवून यातील संशयीत आरोपी नामे गणेश विनायक गायकवाड, वय ३५ वर्षे यास ताब्यात घेतले व त्याचे कडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्हयाची कबूली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले तपासादम्यान आरोपी मजकूर याने सदर गुन्हयाची कबूली देवून गुन्हयातील फसवणूक करुन घेतलेला मुददेमाल काढून दिला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोफौ वाडगे हे करत आहेत.
तसेच वरील आरोपीकडे आणखी सखोल तपास केला असता त्याने सन २०२२ मध्ये करमाळा शहरातील आय सी आय सी आय बँकेसमोर एका महीलेकडून ०१ तोळा वजनाचे सोन्याचे दागिने फसवणूक करुन घेवून गेल्याचे सांगून सदर सोन्याचे दागिने देखील काढून दिले आहेत. सदर बाबत अधिक माहीती घेतली असता सदर घटनेबाबत फिर्यादी  मालन रमेश काळे, वय ६५ वर्षे, रा. पोथरे, ता. करमाळा यांनी करमाळा पोलीस ठाणे गु र नं. ३७३/२०२२ भादवी कलम ४२०, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयातील मुददेमाल हस्तगत झाला आहे. तसेच दुस-या पथकाने यातील दुसरा संशयीत आरोपी  सोमनाथ निवृत्ती फुंदे, वय ४९ वर्षे, रा. भालगाव, ता. पाथर्डी, यास ताब्यात घेवून सदर गुन्हयात अटक केले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास स पो.फौ वाडगे हे करत आहेत.
दि. २०/०५/२०२५ रोजी दुपारी १२/०० वा चे सुमारास फिर्यादी नामे मनिषा श्रीनाथ जाधव, वय २५ वर्षे, रा. सिध्दटेक, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर या करमाळा शहरातील फुलसुदर चौक ते सुभाष चौक येथे खरेदीसाठी आल्या असता त्यांचे पर्समधील ठेवलेले १.५ तोळा वजनाचे सोन्याचे गंठन व ७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप, १.५ ग्रॅम वजनाची लहान मुलाची गळयातील सोन्याची पेटी, ०१ ग्रॅम वजनाचे ०४ सोन्याचे मणी तसेच २,०००/रु रोख रक्कम त्यात ५०० रु दराच्या ०४ भारतीय चलनी नोटा असा मुददेमाल कोणीतरी दोन अज्ञात महीलांनी फिर्यादीचे संमतीवाचून चोरून नेला असलेबाबत करमाळा पोलीस ठाणेस गु र नं. ४१४/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला.सदर गुन्हयाचे अनुषंगाने घटनेच्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करुन घेतली, तसेच सदर घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करुन तसेच सदर सी सी टी व्ही फुटेज बाहेर जिल्यातील पोलीस ठाणेस पाठवून मिळाल्या माहीतीनुसार संशयीत महिला आरोपी नामे छकुली राहूल सुकळे उर्फ डुकळे, रा. मौजे गोयकरवाडी, ता. नामखेड, जि. अहिल्यानगर हीला ताब्यात घेतले. सदर महीला आरोपीकडे गुन्हयाचा सखोल तपास केला असता आरोपी मजकूर हीने सदर गुन्हयाची कबूली दिल्याने तीला सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे. तपासादम्यान आरोपी मजकूर हीस अधिक विश्वासात घेवून तीचेकडे गुन्हयाचा सखोल तपास केला असता तीने सदर गुन्हयातील चोरी केलेला २५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्याचा १०० टक्के मुददेमाल काढून दिल्याने तो गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ / १८२८ शेळके हे करत आहेत.अशा प्रकारे विविध गुन्हयांमधील ४.५ तोळे वजनाचे सोन्याचे सुमारे ४ लाख रुपये किंमतीचे दागिने आरोपीतांकडून जप्त करण्यात आले आहेत.सदरची कामगीरी ही श्री. अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर साो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोहेका / १६४८ अजित उबाळे, पोना/११६२ मनिष पवार, पोना/९१२ ‘वैभव ठेंगल, पोकॉ/१७४८ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ/११४३ सोमनाथ जगताप, पोकॉ/२१४२ गणेश शिंदे, पोकॉ/ ८५६ अर्जुन गोसावी, पोकों / १५५० तोफिक काझी, पोकों / १६७ मिलिंद दहीहंडे, पोका / ४३८ रविराज गटकूळ, पोकों / १५२४ अमोल रंदील, पोकों/६८९ योगेश येवले, तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ / २२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 hour ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

21 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago