Categories: करमाळा

३१ मे ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती प्रत्येक गावा,गावात साजरी करावी.–मा.सरपंच सौ. लक्ष्मी सरवदे

करमाळा प्रतिनिधी ३१ मे ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती प्रत्येक गावा,गावात साजरी करावी असे आवाहन घारगावच्या मा . सरपंच सौ. लक्ष्मी सरवदे यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ३१ मे ला प्रत्येक गावा,गावात साजरी करावी या मुळे समाजात जनजागृती निर्माण होईल,समाजात त्या निमित्याने एकता तयार होईल,समाजाला, व इतर समाज बांधवांना आपल्या मातेचा इतिहास माहीत होईल, समाज आपल्या महापुरूषांचा इतिहास वाचतो तोच समाज इतिहास घडवतो हे नेहमी लक्षात ठेवा,आणि जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास बनवू शकत नाही, या जगात सर्वात मोठा,आणि सुंदर असा इतिहास असेल तर तो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा आहे संपूर्ण जगात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींकडे आदराने पाहिले जाते, *देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली* म्हणून त्यांची त्रिशताब्दी जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करायला हवी, गावातील सर्व समाज बांधवांना एकत्रित करायचे आणि त्याच गावातील जेष्ठ समाज बांधवान कडून राजमाता अहिल्यादेवीच्या फोटोंचे पूजन करून,तेथील समाज बांधवांना मार्गदर्शन करावे,शक्य असेल तर त्या कार्यक्रमाला इतर समाज बांधवांना सुध्दा बोलवावे,त्या मुळे इतर समाज बांधवांना सुध्दा अहिल्यादेवींचा इतिहास माहीत होईल,आणि राजमाता अहिल्यादेवींना एका समाजा पुरते मर्यादित ठेवू नका, त्यांची कीर्ती महान आहे,म्हणून आपण आता आपल्या मातेची जयंती साजरी करत असताना इतर समाज बांधवांना सुध्दा सोबत घेऊन करा,राबवा हा उपक्रम गाव तिथे राजमाता अहिल्यादेवी यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करणार,लागा मग,आपल्या मातेच्या त्रिशताब्दी जयंतीच्या कामाला,जो सोबत येईल त्याला सोबत घेऊन काम करा,जो सोबत नसेल त्याला सुध्दा सोबत घेण्याचा प्रयत्न करा,सर्व हेवें दावे विसरून एकत्रित येऊन आपल्या मातेची जयंती साजरी करा,जय मल्हार , जय अहिल्यादेवी जय क्रांती,परिवर्तन हमारा नारा है सारा समाज हमारा है, असे आवाहन माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे ‌‌.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

5 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

11 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago