केम प्रतिनिधी 18 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत केम मध्ये ग्रामपंचायत केम आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व्हिटामिन सी, कॅल्शियम आणि व्हिटामिन डि3, गोळ्याचे ग्रामस्थांना वाटपाचा कार्यक्रम जिल्हापरीषद अध्यक्ष मा अनिरुद्ध कांबळे साहेब, किंगमेकर नेते मा अजितदादा तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच आकाश भोसले साहेब उपसरपंच नागनाथ तळेकर ,सदस्य, ग्रामस्त, आरोग्य विभाग कर्मचारी उपस्थित होते. कोरोना सर्वेक्षणात आरोग्य कर्मचारी (आशा कर्मचारी) मार्फत या औषधाचे वाटप घरोघरी करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रा. आ केंद्र. केम येथे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पालखे यांनी दिली . या वेळी प्रत्येक आशा कर्मचारी यांना अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली, उपसरपंच नागनाथ तळेकर सर यांच्या कडून प्रोत्साहनपर 2000 रु मा अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष जिल्हापरीषद सोलापूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आरोग्य विभाग आणी ग्रामपंचायत केम यांच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमाचा फायदा घेऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे आवाहन अजितदादा तळेकर यांनी ग्रामस्थांना केले आहे
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…