दिनांक ३०/०५/२०२५ रोजी ००:५० ते ०१:२० चे सुमारास मौजे जेऊर, ता. करमाळा येथे सापळा रचून त्यांना मिळालेले खबरीप्रमाणे एक इसम पांढऱ्या रंगाची बॅग घेवून जेऊर टेंभुर्णी बायपास रोड, जय मोटार गॅरेज जवळ जेऊर, ता. करमाळा येथे जेऊरच्या दिशने चालत जात असताना दिसला. त्याचा आम्हास मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आला. त्वरीत पोलीस पथकाचे मदतीने सदर इसमास घेराव टाकुन पो. नि. रणजीत माने यांनी त्यास त्यांची, सोबतचे पंच व पोलीस पथकाची ओळख करून देवुन आपले ओळखपत्र दाखवुन पोलीस असल्याचा परिचय दिला. सदर इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महादेव बाबुराव फाळके वय ६८ वर्षे, रा. गोविंद बापु नगर, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर असे सांगीतले.नमुद इसमांची अंगझडती व त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बॅगची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन प्लास्टिकच्या पिशव्या मिळून आल्या व त्यात १,५०,२००/- रुपये किंमतीचा हिरव्या रंगाची पाने, फुले, काडया, बिया असलेला असा एकूण ०६ किलो ०८ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. तो पंचाच्या समक्ष पोनि श्री. रणजीत माने यांनी जप्त करून इसम नामे महादेव बाबुराव फाळके वय ६८ वर्षे, रा. गोविंद बापु नगर, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर यास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून त्याच्या विरूध्द पोहवा / ३७५ पांडूरंग आरकिले यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (पप) (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास सहा. पो. नि. श्री. पोपट टिळेकर यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी गुन्हयातील आरोपी महादेव बाबुराव फाळके यास लागलीच अटक करून मा. कोर्टात हजर केले असता, त्यास मा. न्यायालयाने दिनांक २/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. निरीक्षक रणजीत माने, स.पो. नि.पोपट टिळेकर, पोहवा /१५० लोहार, पोहवा / ३७५ आरकिले, पोहवा /१३६ शेख, पोहवा /१२४ ढेंबरे, पोना/१२९९ गोरे, पो.शि.क्र १६७/ दहिहांडे, चापो. शि.क्र ११९८ बारकुंड यांनी केली आहे.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…