Categories: Uncategorized

राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश* *डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार*

मुंबई /प्रतिनिधी

राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबत चे परिपत्रक आज दिनांक 3 जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडिया मधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशनादरम्यान सुद्धा तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुरावामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.

चौकट

*राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा यशस्वी पाठपुरावा*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील12हजार हून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत सन 2019 पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राज मान्यता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर यश मिळाले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

12 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 days ago