Categories: Uncategorized

करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावच्या मा. सरपंच ग्रामसेवकावर ‌ अकरा लाख पंधरा हजार 356 रुपये गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावच्या माजी सरपंच सौ. मनिषा नवनाथ झोळ ग्रामपंचात अधिकारी आर जे गाडेकर यांनी ‌ अकरा लाख 15 हजार 356 रुपयाचा अपहार केला असून शासनाची घोर फसवणूक केल्याच्या कारणावरून विस्तार अधिकारी अविनाश थोरात यांनी फसवणुकीच्या आरोपाखाली करमाळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असून ‌ करमाळा पोलीस स्टेशन मध्ये‌ याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाशिंबे ग्रामपंचायत मध्ये गैर व्यवहार चालू असल्याची तक्रार प्रताप रामदास झोळ यांनी ‌ सरपंच मनीषा झोळ व ग्रामसेवक आरजे गाडेकर यांनी 2017 ते 2022 या कालावधीत ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झाले असल्याची निकिता करार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे केली होती, तत्का. सरपंच ग्रामपंचायत वाशिंबे ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत असताना १४ वा वित्त आयोग अंतर्गत रक्कम रु. १५९१२५४/- व १५ वा वित्त आयोग अंतर्गत १३७३४७१/- असे एकुण रक्कम २९६४७२५/- रुपये सरपंच वाशिंबे यांनी अनाधिकाराने खर्च करणे, १४ वा व १५ वा वित्त आयोग अंतर्गत खरेदी केलेले साहित्य वाटप न करणे, हायमास्ट दिवाबत्ती साठी १५ वा वित्त आयोग मधुन ७४०००/- रु. खर्चबाबत फर्मचा उल्लेख नसणे तसेच करानामा उपलबध नसणे, आयकर, शासकीय विमा, कामगार उपकर, जीएसटी व गौण खनिज इ रकमा कपात करुन योग्य त्याच लेखाशिर्षखाली न भरणे, अपंग कल्याण, महिला बाल कल्याण, अनुसुचित जात व नवबौध्द कल्याण खर्च १०० टक्के न करणे, ग्रामपंचायत दप्तरांमध्ये परस्पर कोणत्याही आदेशाशिवाय परस्पर नोंदी घेऊन नमुना नंबर ०८ चे उतारे देणे, सन १९९१-९२ ते १९९४-९५ चे संदर्भ घेऊन मालमत्ता क्रमांक ४३१ व ४३५ नोंदवले असुन सदरील नोंद घेणेबाबतचा अर्थबोध न होणे, ग्रामनिधी कॅशबुक प्रमाणित न करणे, १५ वा वित्त आयोग व्यवहार नोंदवही सरपंच यांची स्वाक्षरी नसणे, सन २०१९-२० व २०२०-२१ चे लेखापरिक्षण तपासणीस उपलब्ध न करुन देणे, आचारसंहिता असताना रक्कम रु. १९९९२५/- व ४९९८०/- असे एकुण २४९९०५/- रु. साहित्य खरेदी करणे, आर ओ फिल्टर ०३ खरेदी केले असता तपासणीच्या वेळेस प्रत्यक्षात ०१ आर ओ फिल्टर अस्तित्वात असणे, प्राथमिक शाळांकरिता शासकीय मुद्रणालयातुन पुस्तके खरेदी न करणे, आमचा गावा आमचा विकास अंतर्गत आराखड्यामध्ये तरतुद नसताना खर्च करणे, इ त्यामुळे तत्का. सरंपच यांनी त्यांचे पदाच्या कर्तव्यात कसुर करुन आर्थीक अनियमितता केली असल्याचे आहे.
.संबंधित प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर हे दोघेही या प्रकरणात ‌ दोषी असल्याचे ‌ लक्षात आल्यानंतर अविनाश थोरात यांनी ‌ त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .त्यांनी एकूण रक्कम रुपये 199925/- व र.रुपये 49980/- एवढी रक्कम काढून आर्थिक अपहार केलेला आहे. तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामपंचात अधिकारी ग्रामपचायत वाशिंबे यांनी ग्रामपंचायत वाशिंबे येथे केलेल्या आथिक अपहारा बाबत रक्कम रुपये 1115356/- (अक्षरी आकरा लाख पंधरा हजार तीनशे छप्पन रुपये फक्त ) 7.40% व्याजासह तत्कीलन सरपंच ग्रामपंचायत वाशिंबे व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी वाशिंबे यांचेकडून वसुल करण्याची कार्यवाही सुरु करणेत यावी असे आदेश दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

11 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 days ago