Categories: करमाळा

पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीत गाव योजनेचा शुभारंभ करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीतगाव योजनेचा शुभारंभः -करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांची “विकसित गाव” ही संकल्पना आहे. सदर संकल्पनेमध्ये गावातील शेतकऱ्यांनी जलतारा प्रकल्पातुन आपल्या शेतीला बारमाही पाणी उपलब्ध करणे, तसेच सेंद्रीय शेती करुन विषमुक्त भाजीपाला, फळे तयार करणे अभिप्रेत आहे. त्यातुन गावची आर्थिक परिस्थीती सुधारुन गाव गुन्हेगारीमुक्त करणे ही संकल्पना आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्हयातील होणाऱ्या चारही वारींना येणाऱ्या वारकऱ्यांना वारी करणे सोपे जावे यासाठी रस्त्याचे कडेला वृक्षारोपण करुन हरीत वारी हा उपक्रम राबविणे आहे. मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतुन त्यांनी 4 जून रोजी मौजे फिसरे ता. करमाळा येथे मिशन विकसीत गाव अभियानाअंतर्गत सेंद्रीय शेती, जलतारा प्रकल्प व त्यांचे फायदे तसेच हरीतवारी याबाबत मागदर्शनपर शिबीर आयोजीत करुन फिसरे, ता. करमाळा येथील भरत आवताडे यांचे सेंद्रीय शेतीला भेट देवुन त्या ठिकाणी करमाळा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तसेच शेतीतज्ञ तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांच्या सहकार्याने सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्प यातुन होणारे शारिरीक व मानसिक फायदे तसेच सेंद्रीय शेतीच्या उत्पन्नातुन भविष्यात होणारा फायदा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सदर शिबीरामध्ये मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सेंद्रीय शेतीतील अन्नधान्यापासुन मानसिक व शारिरीक फायदे सांगितले. खेडयांचा विकास झाला तर महाराष्ट्र समृध्द होईल. महाराष्ट्र समृध्द झाला तर संपुर्ण राष्ट्र समृध्द होईल या उक्तीप्रमाणे काम करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये जलतारा प्रकल्पातुन जलसंधारण करण्याचे अवाहन केले. यामध्ये सोलापूर जिल्हयातील प्रथम १०० गावे विकसीत करुन संपुर्ण महाराष्ट्र व देशात रासायनीक शेतीला बगल देवुन सेंद्रीय शेतीतुन कमी खर्चात भरघोस उत्पन्न कशा प्रकारे मिळते याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी “सेंद्रीय शेती करा. स्वतःचे आरोग्य आणि उत्पन्न तसेच जमीनीची प्रत वाढवा” असे अवाहन केले. तसेच आयुष्य वाढवायचे असेल तर सेंद्रीय शेती करणे काळाची गरज असल्याचे शेतीतज्ञ तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांनी सांगितले.सदर कार्यक्रमाचे स्वागत मनसे जिल्हा उपाध्यक्ष ‌ नानासाहेब मोरे यांनी केले आभार प्रदर्शन भरत आवताडे यांनी केले व सुत्रसंचालन संदीप शिंदे-पाटील, पोलीस पाटील पोथरे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, रणजीत माने व करमाळा पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले. पोलीस विभागाच्या नेहमीच्या कामातुन वेळ काढुन शेतकऱ्यांकरीता शिबीर आयोजीत केले. सदर ठिकाणी भरत आवताडे यांनी सेंद्रीय शेतीद्वारे उत्पन्न घेतलेली वांगी, आंबा तसेच पालेभाज्या यांची शेत सर्वाना दाखविण्यात आली. त्यांनतर मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी आगामी आषाढी वारीस हरीतवारी संबोधुन प्रमुख पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याच्या कार्यक्रमाचे तसेच जलतारा प्रकल्पाचे उदघाटन केले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

9 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago