Categories: Uncategorized

उजनी जलाशयावरील गोयेगाव ते अजोती पुलाच्या सर्व्हचे काम तातडीने हाती घेण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश- दिग्विजय बागल

करमाळा (प्रतिनिधी)- करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयावरील गोयेगाव तालुका करमाळा ते आजोती तालुका इंदापूर या पुलाच्या कामाचा सर्वे करण्याचे काम तातडीने हाती घेण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याची माहिती मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व शिवसेना जिल्हा युवा नेते माननीय दिग्विजय बागल यांनी आज येथे दिली. याबाबत अधिक माहिती देताना श्री बागल म्हणाले की करमाळा तालुक्यातील गोयेगाव ते आजोती हा पूल वाहतुकीच्या व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने व गेल्या वर्षी कुगाव येथील बोट दुर्घटनेमुळे नागरिकांना करमाळा तालुक्यातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे विविध कामांच्या निमित्ताने जावे लागते बोटीतून होणारा प्रवास अतिशय जीवघेणा व धोकादायक असल्याने गोयेगाव ते आजोती हा पूल होणे अत्यंत गरजेचे होते. परिसरातील नागरिकांची तशी मागणी होती. त्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री नेते आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून गोयेगाव ते आजोती हा पूल तातडीने होणे बाबत सर्वे करण्याचे आदेश मंत्रालयीन पातळीवरून दिले आहेत. त्यामुळे आता या पुलाच्या सर्वे करण्याचे काम तातडीने सुरू होईल व हा पूल झाल्यानंतर करमाळा तालुक्यातून पश्चिम भागातून पुणे जिल्ह्याला होणारी वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास दिग्विजय बागल यांनी यावेळी व्यक्त केला.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago