Categories: करमाळा

करमाळा येथील हमाल भवन येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी- करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ” हमाल भवन ” येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज एस. शर्मा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यु.पी. देवर्षी व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या. संजय घुगे यांचे कायदेविषयक शिबीर या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायाधीश संजय मो. घुगे तसेच करमाळा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.एस.ए.रोकडे, हमाल पंचायत चे अध्यक्ष व आदिनाथ सह. साखर कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत, ॲड. बलवंत राऊत, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. प्रशांत बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायाधीश संजय मो. घुगे यांनी अध्यक्षीय भाषणात आंतरराष्ट्रीय कामगार दिन, असंघटीत कामगारांसाठीच्या योजना, बांधकाम व शेती कामगारांचे प्रश्न व त्यांना उपलब्ध असणा-या योजना तसेच तंबाखु विरोधी दिन व बाल स्नेही कायदेशीर सेवा हे विषय सारांशमध्ये समजावून सांगून विषेशत्वाने ई श्रम कार्डाचे महत्व विषद केले.
या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय कामगार दिन या विषयावर ॲड. राहुल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास ॲड.एस.ए.रोकडे यांनी असंघटीत कामगारांसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची सन २०१५ ची योजना या विषयावर तर ॲड. नवनाथ राखुंडे यांनी तंबाखु विरोधी दिन व राष्ट्रीय विधी सेवाप्राधिकरणाची सन २०२४ ची बालस्नेही कायदेशीर सेवा या विषयावर तसेच ॲड. बलवंत राऊत यांनी बांधकाम व शेती कामगारांचे प्रश्न तसेच केंद्र व राज्य सरकार यांच्या कामगारांसाठी असणा-या विविध योजना या विषयावर वरील मान्यवरांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.पी. खराडे कनिष्ठ लिपीक, सुरज सुरवसे, कनिष्ठ लिपीक यांनी केले. सदर कार्यक्रमास करमाळा तालुका हमाल पंचायत येथील अनेक मान्यवर तसेच एकुण १५० हमाल, तोलार व माथाडी कामगार तसेच सागर सामसे व आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. राहुल सावंत यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. प्रशांत बागल यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago