केम प्रतिनिधी शितलकुमार मोटे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गणेशोत्सवासाठी काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. या नियम व अटी यांची माहिती देण्यासाठी केम पोलीस चौकी च्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, विविध मंडळाचे अध्यक्ष, मूर्ती तयार करणारे कारागीर, व मूर्ती विक्री करणारे विक्रेते यांची बैठक केम पोलीस चौकीचे हवालदार संतोष देवकर यांनी घेतली.
या बैठकीवेळी हवालदार संतोष देवकर यांनी शासनाने गणेशोत्सवावेळी दिलेल्या नियमांची माहिती या बैठकीवेळी दिली. व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन संतोष देवकर यांनी यावेळी केले.
या गणेशोत्सव पार्श्वभूमीच्या बैठकीसाठी हवालदार संतोष देवकर, पोलीस शिपाई सचिन देशमाने, पोलिस कर्मचारी प्रशांत गायकवाड, पोलीस कर्मचारी दत्तात्रय शिंदे,केम गावचे माजी सरपंच अजित तळेकर, केम शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सागर दोंड, पाथुर्डी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शितलकुमार मोटे,केम ग्रामपंचायत सदस्य राहुल कोरे, वडशिवणे गावचे माजी सरपंच रत्नाकर कदम,लाला पठाण, पाथुर्डी गावचे पोलीस पाटील विजय कोरे, सातोली गावचे पोलीस पाटील अनिल सावंत, वडशिवणे गावचे पोलीस पाटील हनुमंत देवकर, निंभोरे गावचे पोलीस पाटील केरबा पन्हाळकर,टिळक गणेशोत्सव मंडळ केम अध्यक्ष धनंजय सोलापूरे,ज्योतीर्लिंग गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष दादा विष्णू पारखे, जय बजरंग मित्र मंडळ केम अध्यक्ष सागर पवार, भैरवनाथ मित्र मंडळ केम अध्यक्ष शिवाजी पाटील,जाणता राजा स्पोर्ट्स गणेशोत्सव मंडळ केम समीर तळेकर, शिवशक्ती प्रतिष्ठान केम अध्यक्ष राकेश दोंड, भगवा रक्षक प्रतिष्ठान केम अध्यक्ष मदन तळेकर, लहुजी मित्र मंडळ केम अध्यक्ष दत्तात्रय तळेकर हे उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव…
करमाळा प्रतिनिधी. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने डॉ…
करमाळा प्रतिनिधी.प्रा निकत सरांचे ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त मा…
करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सह सीना माढा व भीमा सीना जोड कालव्यातून रब्बी पिकासाठी उद्यापासून…
करमाळा प्रतिनिधी - मोरवड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत…
करमाळा प्रतिनिधी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने 4 जानेवारी रोजी जेऊर येथे महा…