श्री.जयवंतराव जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते . 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हा वरती आमदार झाले होते . 2019 साली विधान सभेला श्री. संजय (मामा) शिंदे यांना विजयी करण्यात व 2024 साली श्री.नारायण (आबा) पाटील यांना विजयी करण्यात जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे.माजी आमदार जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व. नामदेवराव जगताप चार वेळा व चूलते स्व.अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते .जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार आहे.लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचे समजते.श्री एकनाथराव शिंदे साहेब विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिंन्हावर करमाळा नगरपालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकविणार असल्याचा निर्धार माजी आमदार श्री जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…