Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी करमाळा शहरातील आनंदी ज्वेलर्सच्या पाच ग्रॅम सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणी महिला आरोपीस अटक

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील मेन रोड येथील आनंदी ज्वेलर्सच्या चोरीच्या गुन्ह्यातील 5 ग्रॅम सोन्याचे समारे 46000/- रुपये किंमतीचे दागिने आरोपीतांकडून जप्त करण्यात आले आहे.6 मे रोजी दुपारी 02.45 वाजण्याच्या सुमारास आनंदी ज्वेलर्स मेन रोड करमाळा ता. करमाळा येथे एका अनोळखी महिला अंदाजे वय 35 ते 40 वर्षाची हिने कानातील झुमके पाहण्याच्या उद्देशाने येऊन फिर्यादीचे दुकानातील 46000/-रु किंमतीचे एक सोन्याची अंदाजे 5 ग्राम वजनाची झुमक्याची जोडी फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरुन नेली आहे.म्हणुन वगैरे मजकुराचा गुन्हा करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 359/2025 भा.न्या. संहिता कलम 305 प्रमाणे फिर्याद दाखल आहे.सदर फिर्यादीच्या अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा व शहर बीट अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन घटनेच्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करुन तसेच सदर घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करुन करमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवुन मौजे सालसे येथील महिला असल्याचे खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणीचे सी.सी.टी.व्ही मधील संशयीत महिला व मौजे सालसे येथील राहणारी रेश्मा संतोष सुकळे वय 37 वर्ष मुळगाव सरणवाडी ता. पंरडा जि धाराशिव सध्या सालसे ता. करमाळा जि. सोलापुर ही असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीचा तिचे नातेवाईकाकडे, आजुबाजुच्या परिसरात तसेच गोपनीय बातमीदारामार्फत वेळोवेळी शोध घेवुन ती मिळुन येत नव्हती तिच्या राहत्या घरी तसेच आजुबाजुच्या परिसरात ठावठिकाणा लागत नसल्याने सदर आरोपी ही मागील एक महिण्यापासुन आपले अस्थित्व लपवुन राहत होती तिचा आम्ही सातत्याने शोध घेतल्याने ती दिनांक 10/06/2025 रोजी राहत्या घरी मिळुन आल्याने तिला महिला पोलीस अंमलदार ब. नं. 1908 पवार त्यांचे मदतीने पोहेकाँ 1828 शेळके यांनी महीला आरोपी हिस ताब्यात घेवुन करमाळा पोलीस ठाणे येथे आणले तिचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता ती तपासात सहकार्य करत नसल्याने सदर गुन्हयात दिनांक 11/06/2025 रोजी 16/37 वाजता अटक करण्यात आली होती तपासा दरम्यान आरोपीने सदर गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल काढुन दिला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ 1828 शेळके हे करत आहेत.अशा प्रकारे गुन्हयातील 05 ग्रॅम वजनाची सोन्याची झुमक्याची जोड सुमारे 46000/-रुपये किंमतीचे दागिने आरोपीकडुन जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सो अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर सो।, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो। करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रणजित माने, पोसई संदेश चंदनशिव, सपोफौ डी. एस. वाडगे, पोहेकाँ 1828 भाऊराव शेळके, पोकाँ 03 हरीदास निमगीरे पोकाँ 1275 प्रसाद काटे व मपोकाँ 1908 शितल पवार व यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखाचे अंमलदार यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

10 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago