Categories: करमाळा

चांडगाव ता- इंदापुर ते पोमलवाडी,ता- करमाळा पुलाचा प्रस्ताव माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी पुर्वीच सादर केला आहे,लवकरच पुलाची मंजुरी मिळेल-ॲड. अजित विघ्ने प्रवक्ते- राष्ट्रवादी काँग्रेस- करमाळा


करमाळा प्रतिनिधी- सोलापुर जिल्हयातील करमाळा तालुका व पुणे जिल्हयातील इंदापुर तालुक्याच्या मधुन भिमा नदीचे विस्तिर्ण पात्र असुन दोन्ही बाजुचे किनाऱ्यावरून चांडगाव ते पोमलवाडी,वाशिंबे ते गंगावळण व कुगाव ते शिरसोडी दरम्यान बोटीतुन प्रवासी वहातुक होते. चांडगाव ते पोमलवाडी या ठिकाणी ऊजनीवरील सर्वात कमी अंतर(७०० मीटर)असुन दोन्ही बाजुला ॲप्रोच रस्ते आहेत.लोणी देवकर येथे राष्ट्रीय महामार्ग असुन केत्तुर, पारेवाडी रेल्वे स्टेशन येथुन मध्य रेल्वेचा मार्ग आहे. हा पुल झाल्यास शिखर शिंगणापुर ते तुळजापुर तसेच शिखर शिंगणापुर ते चौंडी हा पर्यटन मार्ग करमाळा (कमलादेवी) मार्गे अस्तित्वात येणार असुन यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे मराठवाडा कनेक्शन होणार आहे. या पुलाची मागणी गेली अनेक वर्षांपासुन होत असुन माजी आमदार. संजयमामा शिंदे या पुलाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनाही दिलेला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडे सादर केलेला आहे मात्र कुगाव शिरसोडी दरम्यान झालेला बोटीचा अपघात पाहुन महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी कुगाव ते शिरसोडी च्या पुलास मंजुरी दिली होती व त्याचे कामही प्रगती पथावर आहे. यानंतर गोयेगाव ते आगोती( अंदाजे१४५० मीटर) अंतरात पुल व्हावा अशी देखिल मागणी होत असुन. चांडगाव ते पोमलवाडी या पुला करीता अर्थसंकल्प २०२३ व पुरवणी अर्थसंकल्प २०२४ मधे प्रस्ताव मंजुरी करीता माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रयत्न केले होते परंतु निधी अभावी सदरचा पुल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. इंदापुरचे आमदार व मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखिल विधानसभा निवडणुक-२०२४ मधे त्यांचे निवडणुक अजेंडयात चांडगाव ते पोमलवाडी पुल साकारणार असल्याचे अभिवचन दिलेले असुन, या ठिकाणी पुल उभारण्या बाबत राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री मान. अजितदादा पवार यांनी देखिल तशी घोषणा विविध कार्यक्रमातुन केली आहे. सदरच्या पुलाचे व दोन्हीकडील रस्त्यांचे सर्व्हेक्षण होऊन या पुलाचे मंजुरीची चालु पावसाळी अधिवेशनात खात्री असुन,हा पुल विकासाचा राजमार्ग ठरणार आहे. करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी या पुलाचे कामाबाबत सार्व बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली असुन, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बातमी प्रसिद्धीस दिली आहे. यावरून माजी आमदार शिंदे यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस करमाळाचे प्रवक्ते ॲड अजित विघ्ने यांनी याबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिलेली पत्रे,प्रस्ताव तसेच मंत्री महोदय दत्तात्रय मामा भरणे यांनी केलेली कार्यवाही याचे माहितीसह स्पष्टीकरण दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

9 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago