Categories: करमाळा

प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत भारतीय जनता पार्टीचे गणेश चिवटे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

 

करमाळा प्रतिनिधी – माढा प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले आहे.गेली अनेक दिवसांपासून करमाळा कुर्डूवाडी विभागांमध्ये प्रांताधिकारी नियुक्त नसल्याची बाब गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून दिली.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की करमाळा कुर्डूवाडी विभागांमध्ये अनेक दिवसांपासून प्रांताधिकारी नियुक्त नाही.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही यां मागणीची लागलीच दखल घेऊन लवकरच माढा उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती होईल असे सांगितले आहे अशी माहिती गणेश चिवटे यांनी दिली आहे.करमाळा व माढा तालुक्यातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे शासकीय दाखले काढण्यासाठी विलंब होत आहे.शेतकरी व इतर नागरिकांना प्रांताधिकारी नसल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे गणेश चिवटे यांनी ही मागणी महत्वपूर्ण करून या विषयाला वाचा फोडल्याबद्दल नागरिकांमध्ये चिवटे यांचे कौतुक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

9 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

12 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago