Categories: करमाळा

करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या करमाळा ग्रामीण मंडल मधील संघटनात्मक निवडी विविध मोर्चे सेल इच्छुकांच्या मुलाखती दिनांक 17 जूनला होणार -सचिन बापु पिसाळ भाजप तालुका अध्यक्ष

करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या करमाळा ग्रामीण मंडल मधील संघटनात्मक निवडी विविध मोर्चे सेल इत्यादींच्या करिता इच्छुकांच्या मुलाखती दिनांक 17 जून 2025 रोजी सकाळी दहा वाजता भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका माननीय रश्मी दिदी बागल यांचे मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली असून इच्छुकांनी माननीय रश्मी दिदी बागल भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालयात सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करमाळा ग्रामीण भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन पिसाळ यांनी आज येथे केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना श्री सचिन पिसाळ म्हणाले की करमाळा तालुक्याच्या ग्रामीण मंडल मधील विविध मोर्चे सेल इत्यादी संघटनात्मक निवडी करता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सकाळी दहा वाजलेपासून भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका आदरणीय रश्मीदिदी बागल यांचे मार्गदर्शना खाली व नेतृत्वाखाली असून या सर्व मुलाखती सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होतील व त्यानंतर यथोचित व योग्य उमेदवारांच्या निवडी जाहीर होतील यावेळी इच्छुकांनी उपस्थित रहावे. करमाळा तालुक्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रश्मीदीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची करमाळा तालुक्यात वेगवान घोडदौड सुरू आहे त्यामुळे संघटनात्मक निवडीमध्ये विविध पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शेवटी श्री पिसाळ यांनी यावेळी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

8 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

11 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago