Categories: Uncategorized

सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय भक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन

* करमाळा प्रतिनिधी आयएसओ मानांकन प्राप्त सुरताल संगीत विद्यालय करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय भक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा मोबाईलवर दोन ते चार मिनिटापर्यंतच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचे दर्शन घडावे या हेतूने या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे. प्रथम बक्षीस 3001, द्वितीय बक्षीस 2001, आणि तृतीय बक्षीस 1001, उत्तेजनार्थ रुपये 501 प्रमाणे दोन ते तीन बक्षीस दिले जातील. तसेच या सर्वांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे. सोबत गुगल फॉर्म लिंक पाठवलेली असून ती संपूर्णतः भरण्यात यावी.. काही अडचण अथवा शंका असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा तसेच या मोबाईल नंबर पैकी एका मोबाईलवर आपला दोन ते चार मिनिटाचा व्हिडिओ आणि बोनाफाईड सर्टिफिकेट पाठविण्यात यावे.*
*स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे असतील.*
*1) स्पर्धक इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गात शिकत असलेला असावा.*
*2) भक्ती गीत हे मराठी अथवा हिंदी भाषेत असावे.*
*3) मुख्य गायक एकच असावा. गायकाला कोरस हवे असेल तर तिघे जण आणि साथ संगतीसाठी तिघेजणचअसावेत.*
*4) स्पर्धेचा निकाल हा आषाढी एकादशी झाल्यानंतर जाहीर केला जाईल.*
*5) बक्षीस समारंभाचे स्थान हे बक्षीस जाहीर झाल्यानंतर कळवले जाईल.*
*6) आषाढी एकादशीच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आपले व्हिडिओ स्वीकारले जातील. त्यानंतर आलेले व्हिडिओ स्वीकारले जाणार नाही.*
*7) स्पर्धेचा निकाल हा परीक्षकांनी दिलेला अंतिम निकाल असेल.*
संपर्क: 9422446841, 9423537415, 9970196004
*खालील लिंक ओपन करून गुगल फॉर्म भरावा.*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeLNKZ_l5wuexq9b1M17b9TUdlnWg0UcKCMyYX3igDg0GQyVQ/viewform?usp=dialog

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago