Categories: करमाळा

प्रवेशोत्सवात उमगली समाजप्रेमाची भावना – नगरपरिषद मुला-मुलींची शाळा क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांचे प्रेमळ स्वागत

करमाळा (प्रतिनिधी):
शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नवीन स्वप्नांची आणि आत्मविश्वासाच्या प्रवासाची पहिली पायरी. नगरपरिषद मुलींची शाळा क्रमांक 2 येथे झालेला प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता, विद्यार्थ्यांना आनंद आणि प्रेमाने भरलेला अनुभव देणारा क्षण ठरला.

सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांच्या पुढाकाराने आणि नियोजनाने हा उपक्रम अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडला. नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत कॅडबरी चॉकलेट, पुष्पगुच्छ, व खाऊ वाटप करून अतिशय आत्मीयतेने करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि उत्साह वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरवत होते.शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुगे, पताका आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था यामुळे शाळा एकदिवसीय सणासारखी भासत होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बलभीम शिंदे सर यांनी तर आभार प्रदर्शन जोशी मॅडम यांनी केले.
या प्रसंगी नव्याने नियुक्त झालेल्या भालचंद्र निमगिरे सर यांचा शाल, श्रीफळ व फुलांनी सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला माजी नगरसेवक संजय सावंत, फारूक जमादार, माजी नगरसेवक सुपेकर, मनोज कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे, गोपाल वाघमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

11 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

1 day ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

1 day ago