करमाळा प्रतिनिधी मांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या जल्लोषात करण्यात आली. यावेळी नुकतेच पहिली इयत्तेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांना गुलाब पुष्प ,मिठाई व खेळणी वाटून सत्कार करण्यात आला.
नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली असूनही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सुजित तात्या बागल यांनी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला.यावेळी मांगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री कवले गुरुजी , शिक्षिका,सौ सुवर्णा महामुनी ,सौ पवार मॅडम ,सौ देमुंडे मॅडम.शालेय व्यवस्थापन कमिटीचे उमेश बागल , निखिल बागल , पोलीस पाटील आकाश शिंदे ,किशोर बागल , शिवाजी राऊत .यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
कमी होत असल्यामुळे शाळेचे वर्ग बंद पडत आहेत.परंतु असे उपक्रम राबवल्यास नक्कीच प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढेल अशी त्यांना आशा आहे.या त्यांच्या सामाजिक कार्याचे सगळीकडे कौतुक होत आहे..
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…