Categories: करमाळा

करमाळा शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी शहर विकास आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा शहरातील विविध समस्या बाबत करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने करमाळा नगरपरिषदे समोर सुनील बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले असून मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी आज पासून कामास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपले. यावेळी शहर विकास आघाडीचे नेते सुनील बापू सावंत यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांना निवेदन दिले आहे
शहर विकास आघाडीच्या वतीने आज बोलताना सावंत म्हणाले की, करमाळा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना पाच पाच दिवस पाणी भेटत नाही, करमाळा शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत आता आषाढी एकादशी येत आहे लाखो भाविक एकादशी साठी पंढरपूर येथे जातात खड्डयात पडुन कोणतीही इजा होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर खड्उबुजवण्यात यावे,व शहरातील गटारी तुडुंब भरले आहे शहरात कचरा साचलेला आहे या सर्वाची स्वच्छता करण्यात यावी तसेच आषाढी एकादशी पुर्वी शहरात जंतू नाशक पावडर व फिनेल ची त्वरित फवारणी करण्यात यावी आदी मागण्या साठी आज शहर विकास आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, माजी नगरसेवक फारुक जमादार, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे माजी नगरसेवक दिपक सुपेकर, भारिप चे नेते देवा लोंढे,हुमरान मुलाणी, गणेश अडसूळ , पांडुरंग सावंत,साजीद बेग, विलास क्षिरसागर, साबीर नजीर शेख, बापू मोरे जमीर सय्यद राजेंद्र कसाब बापू उबाळे भाऊ दुधाळ जमील काजी संभाजी गायकवाड मार्तंड सुरवसे दत्ता कांबळे आदी जण उपस्थित होते यावेळी पोलीस कर्मचारी बिभीषण जाधव,गणेश दळवी, भाऊसाहेब शेळके, गणेश शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago