करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची 17 जुन रोजी मुंबई येथे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी भेट घेतली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली तसेच शिक्षण क्षेत्रातील काही अडचणी सोडविण्या साठी निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री साहेब यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निवेदनातील विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.
१) महाराष्ट्र राज्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणाचे धोरण हे कृषि, वैद्यकीय तसेव उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लागू करण्यात आलेले आहे तरी या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचे धोरणामध्ये एकसमानता असणे आवश्यक आहे.
२) महाराष्ट्र राज्यामध्ये शिष्यवृत्तीचे धोरण जातीनिहाय वेगवेगळे आहे. तरी यामध्ये एकसमानता असणे आवश्यक आहे.
३) वरील सर्व अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या वसतिगृह भत्त्यात सर्व जाती धर्मासाठी एकसमानता नाही तरी यामध्ये एकसमानता असणे आवश्यक आहे.
४) कृषि, वैद्यकीय तसेच उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मेरीट लिस्ट लागल्यानंतरची प्रवेश प्रक्रिया ही वेगवेगळी राबविली जाते, तरी सदर प्रवेश प्रक्रिया ही आपल्या शेजारील गोवा राज्याप्रमाणे वरील सर्व अभ्यासक्रमांसाठी एकसारखी राबविली जावी.
५) एकसमान पात्रता असणाऱ्या अभ्यासक्रमांना एकच सीईटी असावी.
६) शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची वाहतूक करणाऱ्या बसेस यांना एक समान टॅक्स असावा.
७) बरील सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक टास्क फोर्स नेमावा, ज्यामध्ये वरील संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी, संस्था प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा.अशा अनेक प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत आपण कृषि, वैद्यकीय, उच्च व तंत्रशिक्षक विभागांचे सचिव, संचालक तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, बहुजन कल्याण विभागांचे आयुक्त व संबंधित अधिकारी या सर्वांची एकत्रित बैठक आयोजित केली तर वरील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करता येईल तरी सदरबाबत आपण विशेष पुढाकार घेवून महाराष्ट्र राज्यातील सर्व संस्थाचालकांना व विद्यार्थ्यांना सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष प्रा रामदास झोळ सर यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…