करमाळा प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश (भाऊ) चिवटे यांच्या संकल्पनेतून शालेय साहित्य वाटपाने फिसरे ता. करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे चेहेरे फुलले,
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी फिसरे येथील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद व आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक भरतभाऊ आवताडे, सरपंच हनुमंत रोकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कणसे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे म्हणाले की, “विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती, सध्या पेरणीचे दिवस आहे, आपल्या भागात सर्वच शेतकरी वर्ग आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर बी बियाणे खते यांचा आर्थिक ताण आहे, या उपक्रमामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होवून वेळेची बचत होईल व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य टिकून राहिल या उद्देशाने हा उपक्रम राबविला असल्याचे सांगितले,
यावेळी रामभाऊ ढाणे ,नानासाहेब आवताडे, दादासाहेब चाळक, रामभाऊ खंडागळे,दशरथ निकम, ज्ञानेश्वर चाळक, धनंजय आवताडे ,नवनाथ चाळक, मोहन नेटके,विनोद नेटके ,शुभम नेटके, प्रमोद पाटील, ह.भ.प.अवताडे महाराज, सोमनाथ पाटील, जोतीराम आवताडे , नानासाहेब साबळे, सुमित आवताडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…