भिगवण प्रतिनिधी : “दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स” च्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे ५० विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक दौरा नुकताच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर (NRSC) येथे आयोजित करण्यात आला.
या दौऱ्यात विद्यार्थ्यांना । SRO च्या उपग्रह डेटा प्रक्रिया, पृथ्वी निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय मॉनिटरींगसंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी NRSC च्या उपग्रह ग्राउंड स्टेशन, डेटा प्रोसेसिंग केंद्रे आणि उपग्रह एकत्रीकरण क्षेत्रे पाहिली. तसेच, ISRO च्या शास्त्रज्ञांशी संवाद साधून उपग्रह डेटा संकलन, प्रक्रिया आणि विश्लेषणाच्या प्रक्रियांबद्दल सखोल माहिती मिळवली. या दौऱ्यात शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.या दौऱ्याद्वारे विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात नवा दृष्टिकोन मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…