Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना वेश्या व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका


करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना वेश्या व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महिलांची सुटका केली आहे.
20 जुन रोजी पो.नि. रणजीत माने यांना गोपणीय माहीती मिळाली की, कमलाभवानी लॉज, भवानी पेठ, करमाळा या ठिकाणी एक इसम अवैध कुंटणखाना चालवित आहे, अशी गोपणीय माहीती प्राप्त होताच त्यांनी सदर बाबत छापा कारवाई करणे करीता मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, श्री. अजित पाटील सो. करमाळा उपविभाग, करमाळा यांना माहीती देवून छापा कारवाई करीता अधिकारपत्र घेवून छापा कारवाई करणे करीता स.पो.नि./ पोपट टिळेकर, स.पो.उप. निरी. विश्वास शिनगारे, स.पो.उप. निरी. / दादासाहेब वाडगे, पो. हवा./१८२८ भाऊराव शेळके, पो. हवा./१५० आप्पासाहेब लोहार, पो. शि./१६७ मिलींद दहिहांडे, पो. शि./११४२ स्वप्नील शेरखाने व म.पो.शि./१९०८ शितल पवार, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे याना बोलावून घेवुन छापा कारवाईकामी मागदर्शन करुन, दोन पंच व बनावट गिन्हाईक सह व साहीत्यासह, शासकिय वाहनाने कारवाईसाठी १८:०९ वा. रवाना होवून त्या ठिकाणी लॉजमधील खोलीमध्ये जावुन छापा कारवाई करुन तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
तसेच त्यानंतर सदर ठिकाणी मिळून आलेला प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा. भवानी पेठ, करमाळा याचेकडे पोलीसांनी पंचासमक्ष विचारणा केली असता त्याने नमुद लॉज हे त्यांच्याच मालकीचे असल्याचे सांगुन त्यामध्ये तो नमुद महीलांकरवी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक गिऱ्हाईकामागे त्यास ५००/- रुपये मिळतात असेही त्याने सांगीतले. त्यामुळे इसम नामे प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा भवानी पेठ, करमाळा हा इसम वेश्याव्यवसायासाठी महीला पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द पो.हवा. /१८२८ भाऊराव उत्तरेश्वर शेळके, वयः ४२ वर्षे, नेमः करमाळा पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिल्याचे आरोपी नामे प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा भवानी पेठ, करमाळा याचे विरुध्द भा.न्या.सं. कलम १४३ (२), १४४(२), सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास स्वतः पो.नि./ रणजीत माने हे करीत आहेत. तसेच पिडीत महीला यांना मा. न्यायालयात हजर करून मा. न्यायालयाचे आदेशाप्रमाणे त्यांचे वैद्यकिय तपासणीकामी त्यांना महिला पोलीस अंमलदार यांच्या मार्फतीने रवाना करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो. करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. रणजीत माने, स.पो.नि. पोपट टिळेकर, स.पो.उप. निरी. विश्वास शिनगारे, स.पो.उप.निरी. दादासाहेब वाडगे, पो.हवा. भाऊराव शेळके, पो.  आप्पासाहेब लोहार, पो.शि. मिलींद दहिहांडे, पो स्वप्नील शेरखाने व म.पो.शि.शितल पवार यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago