Categories: करमाळा

करमाळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा गणेश चिवटें यांच्या नेतृत्वात आयोजन


करमाळा प्रतिनिधी– आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून करमाळा शहरात दिनांक २१ जून रोजी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7:00 वाजता शहरातील कन्या हायस्कूल मैदानावर करण्यात आली. या वेळी शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून योगाभ्यासात सहभाग घेतला. विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रशिक्षित योग प्रशिक्षक हनुमानसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व समजून घेतले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस
गणेश चिवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “योग हे फक्त व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र ठेवणारी कला आहे. दररोजच्या जीवनशैलीत योगाचा समावेश केल्यास आपले आरोग्य उत्तम राहते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जगाला पटवून दिलेली हि योग दिनाची संकल्पना आपण अंगिकारून आजपासून दररोज योग करावेत असे आवाहन चिवटे यांनी यावेळी केले,
तसेच या योग शिबिरामध्ये हनुमानसिंग परदेशी, भीष्माचार्य चांदणे सर , चव्हाण सर यांनी योगा बद्दल माहिती दिली,
या योग शिबीरासाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे , तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, प्रमोद फंड, बाळासाहेब कुंभार, पतंजली योग समितीचे राजूकाका वाशिंबेकर, प्रदिप वीर, पत्रकार दिनेश मडके, पूजा माने, नानासाहेब अनारसे, पप्पू शिंदे ,गणेश माने, कमलेश दळवी, प्रवीण गायकवाड, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुक्ता शेलार मॅडम, भीष्माचार्य चांदणे सर ,चव्हाण सर ,प्रवीण बिनवडे सर , पोपटराव शिंदे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते”.या कार्यक्रमात महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता.शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही योगप्रात्यक्षिकात भाग घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश भाऊ चिवटे यांच्यासोबत स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि आरोग्य विभागाने मोलाचे सहकार्य केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago