करमाळा तालुक्यातील मंत्रालय-विधानभवन येथे कार्यरत यांचा मुंबईत स्नेहभेट कार्यक्रम संपन्न..
करमाळा प्रतिनिधी |
करमाळा तालुक्यातील मंत्रालय मध्ये कामकाज करणारे यांचा स्नेहमेळावा मुंबई मध्ये आयोजित करणे व सर्वांना एकत्रित आणणे हा कौतुकास्पद उपक्रम आहे असे प्रतिपादन कक्ष अधिकारी अजय साखरे यांनी केले.
करमाळा तालुक्यातील मंत्रालय-विधानभवन येथे कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांचा शुक्रवार दि २० जून रोजी सचिवालय जिमखाना,मुंबई येथे स्नेहभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मंत्रालयीन पातळीवरील अनुभवाचा आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा अशी अपेक्षा कार्यक्रमाचे संयोजक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली.
आपल्या माध्यमातून गाव तसेच तालुक्यातील सामाजिक काम करण्यासाठी आपण यातून पुढाकार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कक्ष अधिकारी संदीप कदम यांनी केले.
यावेळी सदानंद मोहिते,सुरेखा तळेकर,महेश जाधव,विजय जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या संकल्पना मधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय चांगला कार्यक्रम झाला.
यावेळी उपसचिव शाहजान मुलाणी,मंगेश चिवटे,विनोद गाडे,प्रशांत दौंड,आकाश कांबळे,अक्षय हांडे,राम नलवडे,महेश मोरे,संतोष कांबळे,दत्तात्रय शिरस्कर,प्रवीण पोळ,कल्याणी साळुंखे,रोहित मेहेर,सुजित सावंत,अक्षय शिंदे,संदीप कदम,शैलेश कानडे,दाऊद शेख,मीनाक्षी जाधव,कल्याणी देवकर,निखिल शिंदे,किशोर साळवे,गोपाळ वाघमारे यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश जगताप यांनी केले.सूत्रसंचालन चैतन्य नलवडे यांनी केले तर आभार गणेश घाडगे यांनी मानले.
.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…